बिरसा मुंडा यांच्या चरित्रातून प्रेरणा घ्या

    दिनांक :16-Jan-2023
Total Views |
सडक अर्जुनी, 
Birsa Munda भारताच्या स्वतंत्र लढ्यात जनजाती, वनवासी समाजाचे खूप मोठे योगदान राहिले आहे. या जनजाती क्रांतिवीरांमध्ये बिरसा मुंडा यांचे नाव प्राधान्यने घेतले जाते. बिरसां मुंडा यांनी भारतीय संस्कृती, जनजाती अस्मिता जल, जंगल जमीन यासाठी आयुष्याच्या केवळ 25 व्या वर्षी आत्मबलिदान केले व संपूर्ण समाजाला एक नवी दिशा दिली. त्यांचे संघर्षमय जीवन आपल्या सर्वांमध्ये देशभक्तीची प्रेरणा देते. तरुणांनी बिरसा मुंडा यांच्या चरित्रातून प्रेरणा घेतली पाहिजे आहे, असे प्रतिपादन आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
 
 
munda
 
तालुक्यातील ग्रामपंचायत पाटेकुर्रा अंतर्गत झुरकुटोला येथे आदिवासी समाज संघटनेच्या वतीने क्रांतिसूर्य बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम 15 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा Birsa Munda यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राकाँ जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, बिरसा ब्रिगेडचे चेतनदादा उईके, निकीता इन्फ्रास्ट्रॅकरचे व्यवस्थापक राहूल बालसनवार, सेवानिवृत्त तहसीलदार सी. आर. भंडारी, पोलिस निरीक्षक रमेश चाकाटे, भुमेश्वर पटले, अविनाश काशीवार, सरपंच प्रशांत बालसनवार, डव्वाच्या सरपंचा योगेश्वरी चौधरी, पुष्पमाला बडोले, सरिता बिसेन, जितेंद्र धुर्वे, व समाज बांधव व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.