आधी कोण? कोंबडी की अंडा?...पुराव्यासह मिळाले उत्तर

17 Jan 2023 17:33:54
नवी दिल्ली, 
जगात पहिले कोण आलं? कोंबडी (Chicken) की अंडा? हा प्रश्न जवळपास आपण सर्वजण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. यावर अनेकांनी चिंतन मनन केलेले आहे. पण समाधानाकारक उत्तर मिळू शकलेले नाही. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या तर्कांतून गेलो आहोत. आपल्यापैकी बहुतेकांना तासनतास चर्चा करूनही उत्तर मिळालेले नाही. पण आता याचे उत्तर शोधण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.

Chicken
 
ब्रिटनच्या शेफील्ड आणि वारविक विद्यापीठातील अनेक प्राध्यापकांनी कोंबडी (Chicken) की अंडा या प्रश्नावर खूप खोलवर संशोधन केले. या अभ्यासानुसार, अंडं नाही तर कोंबडी जगात सर्वप्रथम आली. शास्त्रज्ञांच्या मते, कोंबडीच्या अंड्याच्या कवचामध्ये ओव्होक्लिडिन नावाचे प्रोटीन आढळते. या प्रथिनाशिवाय अंडी तयार करणे शक्य नाही. एवढेच नाही तर हे प्रथिन कोंबडीच्या गर्भाशयातच तयार होते, या अर्थाने कोंबडी जगात सर्वप्रथम आली असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ओव्होक्लिडिन तिच्या गर्भाशयात बनवले गेले आणि नंतर हे प्रथिने अंड्याच्या कवचापर्यंत पोहोचले. शास्त्रज्ञांच्या या अभ्यासातून आणि संशोधनातून जगात अंड्याच्या आधी कोंबडी आल्याचे समोर आले. या क्षणी, आणखी एक प्रश्न लोकांना सतावत आहे की कोंबडी जगापर्यंत कशी पोहोचली? हा प्रश्न न सुटलेले कोडे राहिले आहे.
 
Powered By Sangraha 9.0