दाऊद इब्राहिमने केले दुसरे लग्न...पत्ताही बदलला

17 Jan 2023 10:54:34
नवी दिल्ली, 
Dawood Ibrahim अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने दुसरं लग्न केलं असून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासात ही बाब समोर आली आहे. एनआयएला दाऊदच्या जवळच्या नातेवाईकाने याची माहिती दिली असून दाऊदने पुन्हा लग्न केल्याचे सांगितले आहे. यासोबतच दाऊदने त्याची पहिली पत्नी महजबीन हिला घटस्फोट दिला नसल्याचेही समोर आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) तपासात दाऊद इब्राहिमची दुसरी पत्नी पाकिस्तानी पठाण असल्याचे निष्पन्न झाले आहे. दाऊदच्या नातेवाईकाने एनआयएला दुसऱ्या लग्नाची माहिती दिली आहे, पण दुसरी पत्नी कुठे राहणार आहे आणि दाऊदशी कधी लग्न केले याची माहिती दिलेली नाही.
 
anrahim 
 
व्हायरल झालेल्या वृत्तानुसार, Dawood Ibrahim दाऊद इब्राहिमने कराचीतील पत्ता बदलून आता डिफेन्स भागात स्थलांतर केल्याचेही एनआयएच्या तपासात समोर आले आहे. तपासात एजन्सींना असा सुगावा मिळाला आहे की, दाऊदने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधला पत्ता बदलला आहे आणि सध्या तो पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या हद्दीत कराचीमध्ये राहत आहे. दाऊद इब्राहिम भारतात मोस्ट वॉन्टेड असून 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तो पाकिस्तानमध्ये राहत आहे. पण, दाऊद येथे असल्याचा पाकिस्तानने नेहमीच इन्कार केला आहे. मात्र, दाऊद पाकिस्तानातच राहत असल्याचे अनेक पुरावेही समोर आले आहेत. दाऊद इब्राहिम आणि त्याची पहिली पत्नी मेहजबीन यांची मुलगी माहरुख हिचा विवाह पाकिस्तानचा माजी क्रिकेटर जावेद मियांदाद यांचा मुलगा जुनैदशी झाला आहे. जुनैद आणि माहरुखचे काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये लग्न झाले होते आणि रिसेप्शन दुबईत पार पडले होते. लग्नानंतर जावेद मियांदादने सांगितले होते की दाऊदची पत्नी मेहजबीनसोबत त्याच्या पत्नीचे बहिणीसारखे नाते होते आणि महजबीननेच आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता.
Powered By Sangraha 9.0