म्हणे, वाघाचे पिल्लू अन् निघाली रानमांजर..!

अफवांचे पीक आणि ग्रामस्थांसह वनविभागाचीही भंबेरी

    दिनांक :17-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव,
वाघ म्हटले तरी अंगाचा थरकाप उडतो, अशातच वडकी परिसरात वाघीण तिच्या wild cat मृत पिल्लाला सोडून जंगलात पळाल्याच्या अफवेने नागरिकांसह प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. मात्र प्रत्यक्षात वनविभागाच्या चमूने घटनास्थळी भेट दिली असता ती रानमांजर निघाली. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला. मात्र काही काळ नागरिक दहशतीत असल्याचे यावेळी दिसून आले. जिल्ह्याच्या वणी, मारेगाव, झरीजामनी, राळेगावसह परिसरात मागील काही दिवसापासून व्याघ्रदर्शन होत आहे. तर वणी मारेगाव परिसरात काही महिन्यांपूर्वी शेतकर्‍यांवर हल्ला झाल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी शेतमजुरांमध्ये वाघाप्रती चांगलीच दहशत दिसून येत आहे.
 
wild cat
 
अशातच मंगळवार, 17 जानेवारी रोजी वडकी लगत असलेल्या wild cat पिंपरी पांदण रस्त्याजवळ शेतात वाघ दिसल्याची अफवा संपूर्ण गावात पसरली. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या संजय कोरडे, सुभाष केराम, सोमेश्वर केराम यांना पहाटे रस्त्यालगतच्या शंकर कोरडे यांच्या शेताजवळ वाघीण तिच्या नवजात मृत पिल्लाला सोडून पळाली व ते पिल्लू शेतातच असल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती वडकी पोलिसांसह गावकर्‍यांना दिली. त्यानंतर काही क्षणातच विविध समाज माध्यमांवरही वाघ असल्याची वार्ता वार्‍यासारखी पसरली. त्यामुळे भयभीत शेतकर्‍यांसह शेतमजुरांनी मंगळवारी शेतात जाणे टाळले. त्यानंतर वडकी पोलिसांसह वनविभाग पथकाने घटनास्थळ गाठले.
 
 
यावेळी वन पथकाला परिसरात wild cat वाघसदृश्य प्राण्याचे ‘पगमार्क’देखील आढळले. परंतु त्या नवजात पिल्लाची पाहणी केली असता तो वाघ नसून रानमांजर असल्याचे निदर्शनास आले. तशी अधिकृत माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांनी दिली आणि गावकर्‍यांनी सुटकेचा निश्वास घेतला.