सेवाव्रती डॉ. अनिल पटेल यांचा सत्कार

17 Jan 2023 18:28:39
कुरखेडा, 
यवतमाळ येथील  (amhi amchya arogyasathi) सेवाव्रती डॉ. अनिल पटेल यांची ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या स्वंयसेवी संस्थेच्या कार्यालयात कुरखेडा शहर विचार मंचच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेवून त्यांच्या निस्वार्थ सेवेचे कौतुक करीत त्यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पूष्पगुच्छ देवून सत्कार केला.
 

fgfgfgfg 
 
विदर्भातील यवतमाळ येथील  (amhi amchya arogyasathi) सुप्रसिद्ध सामाजिक व्यक्तीमत्व कान, नाक, घसा तज्ञ असलेले डॉ. अनिल पटेल यांचा यवतमाळ येथे वैद्यकीय व्यवसाय आहे. मात्र, आठवड्यातून काही मोजकेच दिवस ते उपजिवेकेकरीता आपल्या व्यवसायाचा गाळा सांभाळतात. इतर दिवशी सेवाभावी वृत्तीने ग्रामीण भागात स्वत:च्या आरोग्य व्हॅनने पोहचत ते मागील 39 वर्षापासून सेवा बजावत आहेत. 70 वर्षाच्या वयातही तरूणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह आहे. ते नुकतेच कुरखेडा व कोरची येथे ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेचे संयोजक डॉ. सतीश गोगुलवार यांच्या आरोग्य शिबिरात सेवा बजावण्याकरीता आले होते. यावेळी कुरखेडा शहर विचार मंचच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्या सेवाकार्याचे कौतुक करीत सत्कार केला. याप्रसंगी मंचचे संयोजक अध्यक्ष माधवदास निरंकारी, सचिव उल्हास महाजन, कोषाध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, सदस्य डॉ. सतीश गोगुलवार, मोहन मनूजा, जिवन नाट, डॉ. जगदीश बोरकर, प्रा. डॉ. दशरथ आदे, रामभाऊ वैद्य, राम लांजेवार, केशव गुरनूले, राजेश उईके, पुष्पराज रहांगडाले, प्रा. विनोद नागपूरकर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0