तभा वृत्तसेवा
भंडारा,
संरक्षित जंगल (birds trapped) परिसरात सापळा लावून सातभाई पक्षांना पकडून विक्रीसाठी नेत असताना तीन आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. तुमसर वनपरिक्षेत्राच्या हद्दीत येणा-या सिहोरा-सिलेगाव मार्गावर गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. यावेळी 17 जिवंत सातभाई पक्षी जप्त करून तिन्ही आरोपींना तुमसर न्यायालयात हजर केले असता त्यांनी जामिन मिळविला.
गडेगाव येथील प्रकाष्ठ (birds trapped) निष्कासन अधिकारी, तुमसर वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचारी हे सिहोरा-सिलेगाव मार्गावर गस्तीवर असतांना एका दुचाकीवर तीन व्यक्ती घेऊन जात असलेल्या पिशवीतून पक्षांचा आवाज आला. त्यामुळे त्यांना थांबवून विचारपूस केली असता तिघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. चर्चेदरम्यान संशय बळावल्याने त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडील पिशवीत पिंजरा आढळला. त्या पिंज-यात 17 जिवंत ‘सातभाई’ म्हणजेच खिरे पक्षी आढळून आले. त्यांच्या ताब्यातून पक्षी, पिंजरा व नायलॉन जाळी जप्त करून तुमसर वनपरिक्षेत्र कार्यालयात आणून सखोल चौकशी केली असता सदर पक्षी पक्षी सिहोरा येथील आठवडी बाजारात विक्रीसाठी नेत असतांनाचे सांगितले.
याप्रकरणी तिन्ही (birds trapped) आरोपींवर वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तुमसर प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी तुमसर येथे रविवारी हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिघांनाही जामीन मंजूर केल्याने सखोल चौकशी होऊ शकली नाही. या कारवाई प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी साकेत शेंडे, तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी. रहांगडाले, क्षेत्र सहायक असलम शेख, एच.के. येरणे, डेव्हीड मेश्राम, ओ.एन. मोरे, ए.जे.वासनिक, अमोल ठाकूर के.बी. भुरे, एस.एस. सेलोकर, सी.ए. पुस्तोळे व वाहनचालक दिनेश शेंडे यांनी केली.