मानोरा,
तालुक्यातील वन भाग (crops) लगतच्या शेतात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ वाढला असून, रब्बी हंगामातील शेतशिवारात बहरलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील वनभागास लागून (crops) असलेल्या रतनवाडी, आमदरी, पाळोदी, रुई, गोस्ता, वटफळ, मेंद्रा, हिवरा खुर्द, शेंदूरजना, आसोला, हातोली, कारपा, देवठाणा, खापरदरी आदीसह इतर भागात भागात वन्य प्राण्यांनी गावलगतच्या शेताकडे कूच केली आहे. जगंल लगतच्या शेतात प्राण्यांचा वावर वाढल्यामुळे शेती करावी की, पडीक ठेवायची या विवंचनेत अनेक शेतकरी सापडले आहेत. वन्यप्राणी पिकांचे नुकसान करत असल्यामुळे शेतकरी उन्हाळ्यातील नगदी पिकाकडे पाठ फिरवू लागला आहे. सध्या शेतात गहू, हरभरा यासह भाजीपाला पिके डौलत आहे. मात्र, दिवसा वानर, रात्री रोहीचा कळप पिकांची नासधूस करत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. आधीच ढगाळ वातावरण व पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत आहे. त्यातच वन्यप्राणी यांचा हैदोस शेतात सूरु असल्याने शेतकरी संकटाचा सामना करीत आहे. शेतातील वन्यप्राणी पळविण्यासाठी शेतकरी विविध प्रयोग करीत असूनही ते निष्फळ ठरत आहे. वनभाग लगतच्या अनेक शेतकर्यांनी शेतात धुर्यावर साडीचे कंपाऊंड टाकून वन्य प्राण्यापासून पिकांचा बचाव करण्यासाठी गुलाबी थंडीत शेती जागल करत पिकांची रखवाली करीत आहे.