नागपूर,
एक आगळी वेगळी कल्पना (timir katha ) घेऊन दोन पुस्तके लवकरच आपल्या भेटीला येत आहेत. दोन कथा लेखिकांनी केलेला एक अफलातून प्रयोग म्हणजे तिमिरकथा ! दोन्ही पुस्तकांचं नाव एकच पण आतल्या कथांचं रुपडं वेगळं ! पुस्तकातील दोन कथांची तर नावंही सारखी पण कथा एकदम वेगळ्या !
'तिमिरकथा' भाग १ च्या लेखिका (timir katha ) आहेत मीनाक्षी मोहरील तर 'तिमिरकथा' भाग २ च्या लेखिका आहेत जयश्री दाणी ! काय असेल या आगळ्या वेगळ्या पुस्तकांमध्ये ही उत्सुकता दूर करण्यासाठी, लवकरच या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. प्रकाशन सोहळ्याची तारीख, वार आणि वेळ यथावकाश जाहीर केली जाईलच. या समारंभाला सुप्रसिद्ध अनुवादक लीना सोहोनी (पुणे), ह्या विशेष करून उपस्थित राहणार आहेत.
(सौजन्य : संपर्क मित्र मीनाक्षी मोहरील)