तभा वृत्तसेवा
भंडारा,
(wild boar crops) शेतातील हरभरा पिकातील (wild boar crops) निंदण काढत असताना रानडुकराने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना शेंद्री/बु. शेतशिवारात घडली.
देवराम रामचंद्र राऊत (50) रा. कोंढा (wild boar crops) असे जखमीचे नाव आहे. देवराम हा स्वत:च्या शेतात पत्नीसोबत हरभरा पिकातील निंदन काढण्यासाठी गेला होता. निंदन काढत असतांना अचानक रानडुकराच्या कडपाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात छातीला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेतकèयाला वनविभागाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.