विनयभंगाचा आरोप...ACP विशाल ढुमेंचे निलंबन

18 Jan 2023 19:21:19
औरंगाबाद,
औरंगाबाद येथे सहायक पोलिस आयुक्त असलेल्या (ACP Vishal Dhume) विशाल ढुमे यांच्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांकडून यावरून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात आला. बुधवारपर्यंत ढुमे यांचे निलंबन न झाल्यास शुक्रवारी औरंगाबाद शहर बंद ठेवण्याची हाक खासदार इम्तियाज जलील यांनी दिली होती. त्यामुळे अखेर गृहविभागाने ढुमे (ACP Vishal Dhume) यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश जारी केला.
 
ACP Vishal Dhume
 
निलंबन असेपर्यंत ढुमे यांना औरंगाबाद पोलिसांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात नमूद आहे. एका ओळखीच्या व्यक्तीला घरी सोडण्याची विनंती करून, गाडीत बसल्यावर त्याच्या पत्नीचा ढुमे यांनी विनयभंग केला होता. एवढेच नाही तर, पीडीत महिलेच्या पतीला बेदम मारहाण केली होती. (ACP Vishal Dhume) महिलेच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
 
न्यायालयात हजर केले असता, त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अवघ्या चार तासांत त्यांना जामीन मिळाला होता. मात्र, त्यांच्यावर (ACP Vishal Dhume) गृहविभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. शुक्रवारी याविरोधात शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे वाढता संताप पाहता विशाल ढुमे यांना निलंबित करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0