आदित्य सावरकर ठरला विदर्भ स्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेचा प्रथम मानकरी

19 Jan 2023 20:02:41
तभा वृत्तसेवा
वर्धा,
विदर्भातील सुप्रसिद्ध संगीत शिक्षक Aditya Savarkar व गायक सुरेश चौधरी यांच्या स्मृतीत 15 जानेवारीला सत्यनारायण बजाज जिल्हा ग्रंथालय व गुरुवर्य सुरेश चौधरी स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त वतीने विदर्भ स्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा झाली. 15 ते 35 च्या वयोगटातील सदर स्पर्धेत 22 स्पर्धकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रा. विकास काळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला अध्यक्षस्थानी यशवंत महाविद्यालयाच्या संगीत विभाग प्रमुख प्रा. अरुणा हरले होत्या. होते. मार्गदर्शक सुनील बुरांडे, अजय हेडाऊ पुरुषोत्तम खासबागे उषा फाले सार्वजनिक वाचनालयाचे सचिव गौरीशंकर टीबडीवाल स्पर्धा संयोजक यशवंत पलेरिया शंकर तिखे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी Aditya Savarkar संगीत क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी योगाचार्य दामोदर राऊत व श्याम सरोदे यांना संगीत भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
 
Aditya Savarkar
 
स्व. सुनील कोटगीरवार Aditya Savarkar स्मृती जयश्री कोटगीरवार यांच्या तर्फे रोख 10 हजार व स्मृतीचिन्ह पुरस्काराचे मानकरी ठरले नागपूरचे आदित्य सावरकर तर स्व. सुरेश सालबर्डे स्मृती सरोज सालबर्डे पुरस्कृत रोख सात हजार रुपये व स्मृतिचिन्ह प्राप्त विजेत्या नागपूरच्या राधा ठेंगडी तर तृतीय पुरस्कार रोख पाच हजार व स्मृतिचिन्ह स्व. मनोहर हेडाऊ स्मृती अजय हेडाऊ यांच्या तर्फे पुरस्कृत पुरस्काराचे मानकरी ठरले अकोला येथील आदिनाथ धुमाळे, यशवंत पलेरिया, पुरुषोत्तम खासबागे व धनंजय नाखले यांच्या द्वारे पुरस्कृत प्रोत्साहन पुरस्कार प्रत्येकी रोख दोन हजार व स्मृतिचिन्ह चे विजेता ठरले प्रज्योत म्हैसकर वर्धा, शुभलक्ष्मी कुळकर्णी यवतमाळ, भैरवी काळे-मोहदूरे वर्धा यांनी पटकावले
 
.
परीक्षण संगीत तज्ज्ञ मंगला देशमुख Aditya Savarkar व खुशबू कठाणे यांनी केले. सूत्रसंचालन नंदिनी बर्वे व किरण पटेवार यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रकाश वैद्य,शंकर तिखे संजय तिळले पेंटर हिरालाल पुणेकर विलास नागोसें नितीन वाघ अजय गुप्ता अरुण चवडे, उमेश कापकर, मोहन शेवळे, अक्षय काटपाताळ, सुरेश चावरे, शिवाजी चावरे, अ‍ॅड. विशाल ठोंबरे, किरण पहुरकर, दीपक भांडेकर, प्रदीप पडोळे यांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0