ले. कर्नल विल्यम लॉम्बटन द्विशताब्दी स्मृतिदिन समारोह

* झिरो माईलचे जनक थांंबले होते हिंगणघाटात

    दिनांक :19-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
हिंगणघाट, 
भारतीय त्रिकोणमितीय सर्वेक्षणाचे William Lambton जनक ले. कर्नल विल्यम लॅम्बटन यांचा द्विशताब्दी स्मृतिदिन शुक्रवार 20 रोजी समितीच्या वतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष व न.पचे माजी अध्यक्ष राजेंद्र डागा यांनी नप सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 
William Lambton
 
या संदर्भात विस्तृत माहिती देताना राजेंद्र डागा म्हणाले की, William Lambton कर्नल विल्यम लॅमबटन द्विशताब्दी समारोह समिती व नगरपरिषद हिंगणघाट यांच्या वतीने 200 वा स्मृतीदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता होणार्‍या या कार्यक्रमात आ. समीर कुणावार अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून ब्रिगेडियर सुनील व्ही. गावपांडे, विदर्भ इंडस्ट्रीज असो. नागपूरचे माजी अध्यक्ष गोविंद डागा, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे हे उपस्थित राहणार आहेत.
 
 
यावेळी चंद्रपूरचे प्रा. डॉ. योगेश दुधपचारे लिखित William Lambton विल्यम लॅमटन यांच्या कार्यावर लिहिलेल्या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन होईल. तत्पूर्वी सकाळी 9 वाजता विद्यार्थ्यांची शहरातून अभिवादन फेरी निघणार आहे. या कार्यक्रम स्थळी येथील ख्यातनाम चित्रकार हरिहर पेंदे यांनी विल्यम यांच्या जीवनकार्यावर काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन तसेच शालेय विद्यार्थ्यानी काढलेल्या चित्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. भारतवासीयांच्या विस्मृतीतून गेलेल्या विल्यम लॅमटन यांची स्मृती कायम राहावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राजेंद्र डागा यांनी दिली. नागपूरचे उद्योजक गोविंद डागा हे विल्यम लॅमटन यांचा अर्धाकृती पुतळा या स्मृतिस्थळी भेट देणार आहेत.
 
 
कर्नल विल्यम लॅमटन William Lambton या विषयावर आयोजित निबंध, चित्रकला, भाषण स्पर्धा याचे बक्षीस वितरण होणार आहे. या स्मृती समारोह कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन स्मृती समारोह समितीचे अध्यक्ष राजेंद्र डागा, सचिव प्रवीण कडू व नप मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी केले आहे. या पत्रपरिषदेला नपचे प्रशासकीय अधिकारी विजय पाटील, नप अभियंता अनिल नासरे, शिखरचंद मुणोत, प्रा. मुक्कावार, प्रभाकर कोळसे, अमित म्हैसेकर उपस्थित होते.