आसाम,
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि (Neelmani Phukan) प्रख्यात आसामी साहित्यिक नीलमणी फुकन यांचे दीर्घायुष्याच्या गुंतागुंतीमुळे आज गुरुवारी येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. साहित्यिक नीलमणी फुकन यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वात शोककळा पसरली आहे.
साहित्यिक नीलमणी फुकन (Neelmani Phukan) त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, कविता ऋषी नीलमणी फुकन हे आसामी साहित्याला समृद्ध करणारे तेजस्वी साहित्यिक तारे होते आणि त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. साहित्यिक नीलमणी फुकन यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
साहित्य क्षेत्रातील त्यांच्या सर्वांगीण योगदानाबद्दल फुकन यांना 2021 चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. बीरेंद्रनाथ भट्टाचार्य आणि मामोनी (इंदिरा) रायसोम गोस्वामी यांच्यानंतर आसाममध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते तिसरे व्यक्ती आहेत. 'कोबिता' या कवितांच्या पुस्तकासाठी त्यांना 1981 मध्ये (Neelmani Phukan) साहित्य अकादमी पुरस्कार, 1990 मध्ये पद्मश्री आणि 2002 मध्ये साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली होती. 2019 मध्ये त्यांना दिब्रुगड विद्यापीठाने डी.लिट देखील प्रदान केले.