मुंबई,
रिलायन्स कंपनीचे मालक Mukesh Ambani electricity bill मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. मुंबईतील अँटिलिया हे निवासस्थान जगातील सर्वात महाग घरांपैकी एक आहे. या गगनचुंबी घराचे महिन्याचे विजेचे बिल ऐकून सर्वसामान्यांना आश्चर्याचा धक्का बसेल इतके आहे. त्यांच्या घराचे महिन्याचे बिल तब्बल 70 लाख रुपये असल्याची चर्चा आहे. अँटिलियाच्या पार्किंगमध्ये वातानुकूलित सुविधा आहे.
सर्वसामान्यांचे डोळे दीपवून टाकणार्या घराचा एका महिन्याला सुमारे 6,37,240 युनिट्स इतका विजेचा वापर होतो. मुकेश अंबानी भारतातील दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, उद्योगपती गौतम अदानी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी आठव्या क‘मांकावर आहेत. त्यांची श्रीमंती पाहता जीवनशैलीही तितकीच चैनीची आहे. मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा विवाह होणार आहे. त्यामुळेही अँटिलियावर सर्वत्र झगमगाट आहे. त्यांचे घर नववधूसारखे सजवण्यात आले आहे. सर्वत्र रोषणाई करण्यात आली आहे. अशातच त्यांच्या Mukesh Ambani electricity bill घराचे महिन्याचे वीज बिल 70 लाख रुपये असल्याची चर्चा आहे.