बुद्धाचा धम्म घराघरांत पोहोचविणे हेच लक्ष्य : अभिनेता गगन मलिक

    दिनांक :02-Jan-2023
Total Views |
गडचिरोली,
भारतात बुद्धाचा धम्म समजणार्‍यांची संख्या कमी आहे. बौद्ध धर्माचा भारतातील प्रचार व प्रसार अत्यल्प आहे. आपल्याला सर्वच धर्माचा सन्मान आहे. आपापल्या धर्मात शिस्तीने वागण्यासाठी प्रत्येकाला बुद्धाचा धम्म कळला पाहिजे आणि तो घराघरात पोहोचविणे हेच आपले लक्ष्य असल्याचे मत अभिनेता गगन मलिक Actor Gagan Malik यांनी आज, 2 जानेवारीला घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेतून व्यक्त केले आहे.
 
Actor Gagan Malik
 
एका कार्यक्रमानिमित्ताने ते येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष मुनिश्‍वर बोरकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना मलिक Actor Gagan Malik म्हणाले, बुद्धाला मानणार्‍या बुद्ध विचारसरणीच्या लोकांना जोडण्याचा आपला प्रयत्न असून आपण एका हिंदू कुटुंबात जन्माला आलो आहे. श्रीलंकेमध्ये श्री सिद्धार्थ या चित्रपटात काम करताना आपल्याला बौद्ध धर्मातील विचार पटले.
 
 
त्यामुळे 2014 साली बौद्ध धर्माचा स्वीकार करुन प्रत्येक घराघरांत बुद्ध पोहोचविण्यासाठी आपण बुद्धाच्या मूर्त्या वितरित करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत भारतात जवळपास 84 हजार मूर्त्याचे गगन मलिक फाऊंडेशनतर्फे वितरण करण्यात आल्याचेही मलिक यांनी यावेळी सांगितले. अभिनय हा आपला व्यवसाय असला तरी बुद्धाचे विचार घराघरात पोहोचविणे हे आपले काम असल्याचेही ते Actor Gagan Malik म्हणाले.