गडचिरोली-भानुप्रतापपूर नवीन रेल्वे मार्ग सर्वेसाठी मंजूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2023
Total Views |
गडचिरोली, 
गेल्या बर्‍याच वर्षापासून प्रलंबित railway line असलेल्या गडचिरोली ते भानुप्रतापपूर (छ.ग.) या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजूरी मिळाली असून अखेर खासदर अशोक नेते यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
 

fgf 
 
 
गडचिरोली जिल्ह्याच्या railway line  सर्वांगिण विकासासाठी सीमेलगतच्या छत्तीसगड राज्याला रेल्वे लाईनने जोडण्याची नितांत आवश्यकता होती. ही आवश्यकता आता पूर्ण होणार आहे. दळणवळणाच्या दृष्टीकोनातून व व्यापारपेठच्या दृष्टीकोनातून या रेल्वे लाईनला फार महत्व आहे. कारण छत्तीसगड राज्यातील अनेक व्यावसायिक गडचिरोली येथे व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील अनेक व्यावसायिक छत्तीसगड राज्यात व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे मध्यप्रदेश-छत्तीसगड यामघ्ये व्यापारपेठ अधिक दृढ होणार होऊन व दळणवळण वाढणार आहे. विशेष म्हणजे, यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.
 
 
आधीच गडचिरोली railway line  ते सिरोंचा रेल्वे लाईन मंजूर झाली आहे. सदर पुढील आवश्यक प्रशासकीय कार्य केंद्र व राज्य सरकारद्वारे संयुक्तपणे सुरू आहेत. तसेच वडसा ते गडचिरोली रेल्वे लाईन मंजूर झाले आहे. सदर रेल्वेलाईन करिता जमिनीचे अधिग्रहण युद्धस्तरावर सुरू आहेत. आणि विशेष म्हणजे, खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नातून आता गडचिरोली ते भानुप्रतापपूर नवीन रेल्वेलाईनसाठी सर्वे मंजूर झाले आहे. त्यामुळे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांचे गडचिरोली व छत्तीसगड राज्यातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@