यावेळी भावनाताईंना संधी हवीच..

20 Jan 2023 20:30:11
- अनिरुद्ध पांडे
 
यवतमाळ, 
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या MP Bhavna Gawli खासदार भावना गवळी यांना लवकरच होऊ घातलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात संधी मिळेल असे दिसते आहे. यापूर्वी कमीतकमी दोनवेळा हुकलेली ही संधी यावेळी तरी त्यांना मिळायलाच हवी, असे त्यांना पाचवेळा निवडून देणार्‍या मतदारांना मनापासून वाटते आहे. 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 अशा सलग पाच लोकसभा निवडणुका जिंकून अपराजित असलेल्या शिवसेनेच्या एकमेव महिला खासदार म्हणून भावनाताईंची नोंद आहे. पण जी नोंद लोकसभेच्या पटलावर आहे, जे महाराष्ट्रातील जनतेला, बहुतांश शिवसैनिकांना माहीत आहे त्याची दखल शिवसेना नेत्यांना, पक्षप्रमुखांना यापूर्वी घ्यावीशी वाटली नाही हे तसे धक्कादायकच होते त्यावेळी.
 
 
MP Bhavna Gawli
 
2014 मध्ये भावना गवळी चौथ्यांदा शिवसेनेच्या खासदार म्हणून निवडून आल्या. त्यावेळी त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते. त्यावेळी शिवसेना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रात सत्ता स्थापन करणार्‍या एनडीएमध्ये शिवसेना सुखात होती. खरे तर त्याचवेळी उद्धवसाहेबांनी चौथ्यांदा निवडून आलेल्या आपल्या एकमेव महिला खासदार म्हणून MP Bhavna Gawli भावनाताईंना केंद्रात संधी द्यायला हवी होती. पण भावनाताईच कुठेतरी कमी पडल्या असाव्यात, त्यांची मर्जी सांभाळण्यात..! 2019 ची लोकसभा निवडणूक झाली आणि भावना गवळी पाचव्यांदा खासदार झाल्या. त्याहीवेळी शिवसेना एनडीएमध्ये होतीच आणि त्यांचे खासदार मंत्रीही झालेच होते. पण त्याहीवेळी उद्धवजींनी भावनाताईंचा विचार केला नाही. नेमकी कोणती अडचण होती, खा. गवळी नेमक्या कुठे कमी पडत होत्या, हे उबाठांशिवाय कोणालाही माहीत नव्हते किंवा कळत नव्हते. पण खा. गवळींची संधी दुसर्‍यांदाही हुकली होती.
 
 
 
पण 2019 च्या लोकसभेची अर्धी मुदत संपली आणि शिवसेनेपुरते तरी केंद्रातील दृश्य बदलले. शिवसेना फुटली आणि जुनी शिवसेना एनडीएच्या बाहेर पडली. पण जुन्या शिवसेनेच्या तुलनेत फुटलेली शिवसेनाच खरी असे म्हणण्याची वेळ आली. जुन्या उबाठा शिवसेनेत 18 पैकी सहाच खासदार आणि 55 पैकी पंधराच आमदार शिल्लक राहिले. उद्धव आणि आदित्य पीडित मोठ्या सं‘येने बाहेर पडले आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाऊन बसले. आता उबाठांनी सर्वात जास्त पिळून काढलेले एकनाथ शिंदे नव्या ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेचे’ नेते आहेत. ही शिवसेना आता एनडीएमध्ये आहे आणि आणि केंद्रात मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यताही आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मु‘यमंत्री असलेले नेते एकनाथ शिंदे आपल्या शिवसेनेच्या MP Bhavna Gawli खासदार भावना गवळी यांच्या नावाची मंत्रीपदासाठी शिफारस करतीलच अशी अपेक्षा आहे, नव्हे खा. गवळींवर उबाठांनी केलेला अन्याय दूर करण्याची जबाबदारी आता त्यांच्यावरच आहे.
Powered By Sangraha 9.0