मानोरा,
यावर्षी झालेला अतिवृष्टीच्या Farmers deprived पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसान झालेल्या शेतकर्यांना शिंदे - फडणवीस सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली. परंतु, जाहीर करण्यात आलेल्या मदतीची आर्थिक रक्कम केवल दोनच मंडळामधील शेतकर्यांच्या खात्यात जमा झाल्याने इतर चार मंडळमधील शेतकरी मदतीची प्रतीक्षेत आहेत.
तालुयात इंझोरी, मानोरा,Farmers deprived कुपटा, उमरी खुर्द, गिरोली व शेंदूर्जना असे एकूण सहा महसूल मंडळ आहेत. सुरुवातीला अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर झालेल्या गिरोली आणि शेंदूरजना या दोन महसूल मंडळातील शेतकर्यांच्या खात्यात प्रशासनाच्यावतीने खात्यात रक्कम जमा करण्यात आलेली असून, उर्वरित चार महसूल मंडळमधील शेतकरी अद्यापही शासनाच्या अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित आहेत. यावर्षी सप्टेंबर ऑटोबर महिन्यात तालुयात अतिवृष्टीने कहर केल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कपाशी यासह फळपिकांसह जमिनी खरडून गेल्याने अतोनात नुकसान झाले होते. शासनाने दिवाळीपूर्वी मदत शेतकर्यांच्या खात्यात टाकण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अद्यापपर्यंत केवळ दोनच महसूल मंडळातील शेतकर्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आलेली आहे. शासनाने यावर्षी नुकसान भरपाईची मर्यादा २ हेटर वरून ३ हेटर एवढी केली आहे. यामध्ये कोरडवाहू क्षेत्राकरिता हेटरी १३ हजार ५०० रुपये एवढी मदत शासनाने जाहीर केली होती. परंतु, अद्यापही मदत मिळसनर नसल्याने शासनाने याची दखल घेऊन शेतकर्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करावी, अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.