सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
सावित्रीबाई फुले शिक्षण समिती (Savitribai Phule Jayanti) यवतमाळद्वारा आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व दत्तक पालक समारोह श्री नारायणराव माकडे हायस्कूल व स्व. रामभाऊजी ढोले विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात पार पडला.
 
Savitribai Phule Jayanti
 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान (Savitribai Phule Jayanti) श्री संताजी शिक्षण प्रसारक मंडळच्या उपाध्यक्ष सुमन साखरकर, स्वागताध्यक्ष सावित्रीबाई फुले शिक्षण समिती यवतमाळच्या अध्यक्ष प्रा. डॉ. आशा देशमुख यांच्या समवेत प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी, उपशिक्षणाधिकारी प्रदीप गोडे, गटशिक्षणाधिकारी विद्या वैद्य, डॉ. सुधा राठी, साधना बंडेवार, रमाबाई आंबेडकर विद्यालयाच्या मुख्याध्यापक सुलभा कटके, अंग्लो हिंदी हायस्कूलच्या मु‘याध्यापक अंशुल जैन, प्रा. लता वाघेला, सेवा निवृत्त मुख्याध्यापक नरेंद्र पवार होते.
 
 
प्राचार्य साक्षी बनारसे यांनी मान्यवरांचे शाल, श्रीफळ व वृक्ष कुंडी देऊन स्वागत केले. (Savitribai Phule Jayanti) आयोजीत निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, गायन व इतर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींना अतिथींच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. दहावीतील वैष्णवी येरके हिने ‘मी सावित्री बोलतेब ही एकपात्री एकांकिका सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष आचलिया यांनी केले. सूत्रसंचालन कल्पना चांभारे, आभारप्रदर्शन प्रा. सविता हजारे यांनी केले. कार्यक्रमासाठी नारायणराव माकडे शाळेचे शिक्षक श्याम जतकर, रुपेश लोखंडे, कांचन मून, ऋतुजा गुल्हाने, रिया शिरभाते, राखी बुटले तसेच कर्मचारी अनिल गुल्हाने, विलास गुल्हाने, बाबाराव मरसकोल्हे, अंकुश जीरापुरे यांनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@