तभा वृत्तसेवा
पुसद,
शनिवार, 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता येथील (Hindu Garjana Morcha) वसंतराव नाईक चौकातून जोरदार घोषणाबाजी करत प्रखर हिंदू नेते कालीचरण महाराजांच्या उपस्थितीत हजारो महिला व पुरुषांचा सहभागातून निघालेल्या हिंदू गर्जना मोर्चाने पुसदकरांचे लक्ष वेधून घेतले.
समाज आणि संस्कृतीचा सर्वनाश करणार्या (Hindu Garjana Morcha) लव्ह जिहाद, धर्मांतरण, गोहत्या अशा सर्व राष्ट्रविघातक समस्यांचा नायनाट करणारा कायदा बनवून राष्ट्र व धर्माचे रक्षण करावे. व जनसंख्या नियंत्रण कायदा ह्या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सकाळी 11 वाजता 10 हजारांहून अधिक हिंदूंचा सहभाग असलेला हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला. येथील वसंतराव नाईक चौक, महात्मा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, तहसील चौक अशा निघालेल्या मोर्चाचे यशवंत रंग मंदिर येथे जाहीर सभेत रूपांतर झाले.
यावेळी पोहरादेवी येथील (Hindu Garjana Morcha) जितेंद्र महाराज व नीरू महाराज यांनी, मागील काही वर्षार्ंत अनेक गोरबंजारा मुली लव्ह जिहादच्या बळी ठरल्या आहेत असे सांगून गोहत्या बंदी आणि धर्मांतरण कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी आपल्या भाषणातून केली. प्रमुख वक्ता व मार्गदर्शक कालीचरणं महाराज यांनी उपस्थित हजारो हिंदू मोर्चेकर्यांना ‘जातीवाद छोडिए, हिंदुत्व को जोडिए’ असा संदेश देत मतदान करून आपल्याला पाहिजे तसे कायदे करणारा राजा गादीवर बसवा, असे आवाहन करून हिंदुत्वाची व्या‘या सांगितली.
या मोर्चामध्ये सर्व (Hindu Garjana Morcha) हिंदुत्ववादी संघटनांच्या हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग होता. शनिवारी सकाळपासूनच पुसद बाजारपेठेतील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली होती. मोर्चामध्ये आमदार निलय नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, डॉ. आरती फुपाटे, मोहिनी इंद्रनील नाईक, सुनीता तगलपल्लेवार, रवी ग्यानचंदानी, सूरज डुब्बेवार, अजय पुरोहित, डॉ. पंकज जयस्वाल, प्रा. सुरेश गोफणे, बालाजी कामिनवार प्रामु‘याने सहभागी होते. हजारो महिला, पुरुष, युवक, युवतींचा सहभाग असलेल्या या मोर्चा दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनात पुसद शहर पोलिस ठाणेदार दिनेश शुक्ला यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.