शालेय विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री food suppliment पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत शालेय पोषण आहार दिल्या जातो. मनपा हद्दीतील जिल्हा परिषद, मनपा तथा सर्व खाजगी शाळांना पोषण आहार केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे जानेवारी महिन्यापासून देण्यात येत आहे. मात्र, विविध अडचणींसह निकृष्ठ पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांची उपासमार होत असल्याची 25-30 शाळांनी लेखी तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत शालेय पोषण food suppliment आहार मनपा हद्दीतील जिल्हा परिषद, मनपा आणि खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जातो. मनपा हद्दीत ही योजना केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे राबविण्याचा निर्णय जानेवारी महिन्यापासून घेण्यात आला. या योजनेचे कंत्राट तीन संस्थांना देण्यात आले. मनपा हद्दीतील शाळांना दररोज शिजलेल्या ताज्या अन्नाचा निश्चित केलेल्या पाककृतीप्रमाणे व शाळेच्या वेळापत्रकानुसार निश्चित केलेल्या वेळेत केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत उष्णता रोधक स्टिलच्या डब्यातून तथा बंदिस्त वाहनातून पोषण आहाराचा पुरवठा कंत्राटदार संस्थांनी शाळांना करणे बंधनकारक म्हटले आहे. यासोबतच दर बुधवारी नियमित आहारा व्यतिरिक्त पूरक आहार देण्याबाबतच्या सूचना आहेत . याशिवाय विविध अटी-शतींचे बंधन पुरवठादार संस्थांना आहे. मात्र, या सर्व अटी-शर्ती केवळ खानापूर्ती तर नव्हे ना अशी चर्चा आता पालकांमध्ये आहे.
मनपा हद्दीतील जवळपास 25-30 शाळांनी केंद्रीय food suppliment स्वयंपाकगृह प्रणाली अंतर्गत मिळणार्या पोषण आहाराबाबत मनपा आयुक्त, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना गुरुवार, 19 जानेवारी रोजी पत्र देऊन शाळांच्या अडचणींचा पाढा वाचला. यात मुख्यत: विद्यार्थी संख्येनुसार पोषण आहार मिळत नसाल्याची तक्रार आहे. निश्चित केलेल्या मेनूप्रमाणे पोषण आहार शाळेत येत नसून विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया समाधानकारक नाहीत तसेच सद्यस्थितीत मिळणारा पोषण आहार विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक नाही, शालेय पोषण आहाराच्या वितरणाची कोणतीही व्यवस्था आणि वेळेचे नियोजन नसल्याचा आरोप या पत्रात केला आहे. विशेष म्हणजे दोन दिवस होऊनही या पत्रात नमूद समस्यांबाबत समाधानकारक उत्तर शाळांना मिळाले नाही , तर पोषण आहाराची गुणवत्ता आणि इतर अडचणीबाबत कंत्राटदारांची बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.