अकोला,
Railway Station : केंद्र शासनाच्या ‘वन स्टेशन, वन शॉप’ या उपक्रमाअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळावे व उत्पादनांना देशभरात बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता अकोला रेल्वे स्थानकावर स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या स्टॉलवर संघा टेक्सटाईल्स क्लस्टरव्दारे उत्पादित विविध उत्पादने विक्रीकरिता ठेवण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या हस्ते या स्टॉलचे उद्घाटन सोमवार, 23 जानेवारी रोजी करण्यात आले. अकोला रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 वर हा स्टॉल लावण्यात आला आहे. उद्घाटनप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नीलेश निकम, व्यवस्थापक सारंग पटेल, रोजगार व स्वयंरोजगार तथा कौशल्य विकास द. ल. ठाकरे, अकोला रेल्वेस्थानकचे संतोष कवडे, संघा टेक्सटाईल्स क्लस्टरचे संचालक कश्यप जगताप आदी उपस्थित होते.