लोकशाही एका शहरांच्या देशातली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2023
Total Views |
आंतरराष्ट्रीय
 
 
- वसंत गणेश काणे
 
 
ब्राझील हा (Brazil Democracy) दक्षिण अमेरिका सर्वांत मोठा देश आहे. तो अ‍ॅमेझॅान या महाकाय नदीसाठीही प्रसिद्ध आहे. 8.5 चौरस मिलियन किमी क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा म्हणजे भारतापेक्षा अडीचपट मोठा आहे. ब्राझीलची लोकसंख्या मात्र 21 कोटी 50 लाख एवढीच आहे. पण या लोकसंख्येनुसारही तो जगातला पाचवा मोठा देश आहे. ब्राझीलच्या पूर्वेला अटलांटिक महासागर असून, या 7,491 कि. मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी लाभली आहे. या देशात पोर्तुगीज भाषा बोलली जाते. ब्राझीलमध्ये गोरे 47.7 टक्के, संमिश्र 43.1 टक्के, कृष्णवर्णी 7.6 टक्के, आशियन 1.1 टक्के आणि मूळ निवासी मात्र फक्त 0.4 टक्के आहेत. ब्राझीलमधील तब्बल 87 टक्के लोक शहरात राहतात, तर फक्त 13 टक्के लोकच खेड्यांमध्ये राहतात. प्रकारे ब्राझील हा शहरांचा देश आहे. 99 टक्के साक्षरांचा देश असलेला ब्राझील, संयुक्त राष्ट्र संघ (युनो), जी 20, ब्रिक्स, मरकोसूल यासारख्या महत्त्वाच्या संघटनांचा संस्थापक सदस्य देश आहे. जी 20 ची पुढची म्हणजे 2024 ची शिखर परिषद ब्राझीलमध्ये होऊ घातली आहे.
 
Brazil Democracy
 
ब्राझीलमधील (Brazil Democracy) सार्वत्रिक निवडणुकीची पहिली फेरी 2 ऑक्टोबर 2022 ला पार पडली. ही निवडणूक देशातील यश्चयावत सर्व पदांसाठी होती. ज्यांना वैध मतदानापैकी 50 टक्के +1 इतकी किमान मते मिळाली, ते निवडून आले. उरलेल्या जागांच्या बाबतीत पहिल्या दोघांमध्ये मतदानाची दुसरी फेरी 30 ऑक्टोबर 2022 ला रविवारीच पार पडली. यात दोघांपैकी ज्यांना वैध मतदानापैकी 50 टक्के +1 इतकी किमान मते मिळाली, निवडून आले. पहिल्या आणि दुसर्‍या फेरीत अनुक्रमे 79.05 टक्के आणि 79.41 टक्के असे म्हणजे जवळपास सारखेच मतदान झालेले आढळते. याचा अर्थ असा की, दोन्ही फेर्‍यांकडे मतदारांनी सारख्याच गांभीर्याने पाहिले.
 
मतदानाची सक्ती, पण कशी?
18 ते 70 वयाच्या मतदारांना मतदान करणे सक्तीचे आहे. मतदान न केल्यास दंडाची तरतूद आहे. पण ते 18 वय असेल किंवा वय 70 पेक्षा जास्त असेल तर मात्र मतदान करणे ऐच्छिक आहे. सैनिकांना राजकीय भूमिका नसावी यासाठी सैनिकी पेशातील व्यक्तींना मतदानाचा अधिकार नसतो. ब्राझीलमध्ये राहणार्‍या पोर्तुगीज नागरिकांना आणि पोर्तुगालमध्ये राहणार्‍या ब्राझिलियन नागरिकांना मतदानाचा तसेच निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार त्या-त्या देशात असतो. याला इक्वालिटी स्टॅट्युट असे या आशयाचा करार पोर्तुगाल आणि ब्राझीलमध्ये 7 सप्टेंबर 1971 मध्ये करण्यात आला आहे.
 
 
2022 मध्ये अतिउजव्या विचारसरणीचे विद्यमान अध्यक्ष (Brazil Democracy) जेर बोलसोनारो दुसर्‍यांदा आपले नशीब आजमावून पाहत होते. 2018 मध्ये ते सोशल लिबरल पार्टीचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. पण 2019 मध्ये त्यांनी सोशल लिबरल पार्टीचा राजीनामा दिला आणि वेगळी करण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. ब्राझीलमध्ये अमेरिकेप्रमाणे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या जोडगोळीला म्हणजेच टिकेटला मतदार मतदान करतात. जोडगोळीच पडते किंवा जिंकते.
 
 
माजी अध्यक्ष लुई इनासिओ लुला द सिल्व्हा हे लेफ्ट विंग वर्कर्स पार्टीचे उमेदवार तिसर्‍यांदा, पण सलग तिसर्‍यांदा नव्हे, तर 2022 मध्ये आपले नशीब आजमावून पाहत होते. ते 2002 2006 मध्ये (Brazil Democracy) ब्राझीलचे अध्यक्ष होते. लुला यांच्यावर 2016 मध्ये महाभियोग चालवून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. पुढे कोर्टकचेर्‍या होऊन लुला यांना त्यांचे सर्व अधिकार 2021 मध्ये बहाल करण्यात आले. 2022 मध्ये लुला यांनी निवडणूक लढविली आणि अल्प मताधिक्याने जिंकली.
 
जेर बोल्सनारो आणि लुई इनासिओ लुला द सिल्व्हा- कोण कसा?
बोल्सनारो यांची मुक्ताफळे- मी बलात्कार करावा अशी तुझी लायकी नाही, असे एका महिलेविषयी अश्लाघ्य उद्गार काढणारे, मला पाच मुले आहेत, पण सहाव्या अपत्याच्या वेळी मी अशक्त होतो आणि मला मुलगी झाली, असे मुलखावेगळे ज्ञान पाजळणारे, कैद्यांचा आणि गुन्हेगारांचा छळ करायलाच हवा, अशा मध्ययुगीन भूमिकेला आजही कवटाळून बसणारे, माझा मुलगा निघाला तर मला त्याच्याविषयी काहीही ममत्व वाटणार नाही, अशी असंवेदनशील आणि अपरिपक्व भूमिका स्वीकारणारे बोल्सनारो किती खुज्या व्यक्तिमत्त्वाचे आणि वैचारिक दारिद्र्य असलेले होते, याची पुरेपूर कल्पना येऊ शकेल. त्यांची अप्रगत आणि विकृत सामाजिक भूमिका, विज्ञाननिष्ठा तर सोडाच पण विज्ञानविरोधी दृष्टिकोन, मागास वृत्ती कोणाचेही डोळे उघडणारी ठरावी. आजकाल युरोप आणि खंडात जनमताला प्रतिगामी व्यक्तीच आपल्याशा का वाटू लागल्या आहेत, कुणास ठाऊक? हा एक अभ्यासाचाच विषय आहे. यांचा ब्राझीलमध्ये पराजय झाला याचे कुणालाही वाईट वाटण्याचे कारण नाही. (Brazil Democracy) वाईट वाटते ते याचे की, प्रतिगामी आणि प्रगत विचाराच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमधला फरक अत्यल्प आहे!
 
 
मला जिवंत गाडण्याचा प्रयत्न झाला, पण मी तो होऊ दिला नाही, असे लुला निर्दोष सिद्ध झाल्यानंतर म्हणाले आहेत. भ‘ष्टाचाराच्या आरोपाखाली दोन वर्षे तुरुंगात खितपत पडल्यानंतर आरोप सिद्ध होऊ न शकल्यामुळे त्यांना मुक्त करण्यात आले होते. लुला हा जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणे कामगार वर्गातून आणि चळवळीतून पुढे आलेला राजकारणी नेता आहे. साहजिकच त्यामुळे त्याच्यावर डावेपणाचा शिक्का बसला आहे. पण दोनदा, म्हणजे 2002 आणि 2006 या वर्षी, त्यांच्या हाती ब्राझीलची सत्ता आली, तेव्हा त्या काळात त्यांचा डावेपणा अनुभवाला आला नाही. उलट (Brazil Democracy) ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेने त्यांच्या कार्यकाळात उत्कर्षाच्या दिशेने कूस बदललेली आढळते. वैचारिक डावेपण गुंतवणुकीच्या विरोधात नसते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. पोथीनिष्ठ डावेपण आज राजकारणात कुठेही यशस्वी झालेले दिसत नाही. नफ्याची जोड देणे म्हणजे भांडवलशाहीचा पुरस्कार करणे नव्हे, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले. सुरक्षित सामाजिक जीवन आणि रोजगारनिर्मितीसाठी भांडवली गुंतवणुकीवर त्यांनी सतत भर दिलेला दिसतो.
 
 
लुला यांना पहिल्या फेरीत 48.43 टक्के मते मिळाली, तर विद्यमान अध्यक्ष बोलसोनारो यांना 43.20 टक्के मते मिळाली. म्हणजे विद्यमान अध्यक्षाला 5.23 टक्के मते कमी हे असे विद्यमान अध्यक्षाच्या बाबतीत (Brazil Democracy) ब्राझीलच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. पण तरीही 50 टक्के +1 इतकी किमान मते न मिळाल्यामुळे मतदानाची दुसरी फेरी लुला आणि बोलसोनारो यांच्यात 30 ऑक्टोबर 2022 ला घेण्यात आली. यावेळी लुला आणि बोलसोनारो यांना अनुक‘मे 50.90 टक्के आणि 49.10 टक्के मते मिळाली. म्हणजे लुला फक्त टक्के मतांच्या फरकाने विजयी झाले.
 
बोलसोनारो समर्थकांचा निकाल स्वीकारण्यास नकार
लुला यांना पहिल्या फेरीत आघाडी मिळाली तेव्हापासूनच बोलसोनारो यांनी त्यांच्यावर बेछूट आरोप करायला सुरुवात केली होती. पण हे (Brazil Democracy) आरोप निरीक्षकांना योग्य वाटले नाहीत. दुसर्‍या फेरीतही लुला यांनी आघाडी घेताच बोलसोनारो यांचा तिळपापड झाला. त्यांनी सुपीरियर इलेक्टोरल कोर्टात तक्रार केली. व्होटिंग मशिनने केलेल्या नोंदी चुकीच्या आहेत, असा आक्षेप नोंदविला. कोर्टाने त्यांचा आक्षेप तर फेटाळलाच शिवाय त्यांना भला मोठा म्हणजे 4.3 मिलियन डॉलर्स एवढा दंडही ठोठावला. निवडणुकीची दुसरी फेरी पूर्ण होते न होते तोच बोलसोनारो समर्थकांनी ब्राझीलिया या राजधानीच्या शहरासह रिओडिजानेरो, सॅल्व्हॅडोर, बेलो हॉरिझाँटे, सॅओ पॉलो, मॅनॉस अशा सर्व मोठ्या निदर्शने करण्यास सुरुवात केली. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच देशभर निदर्शने, हल्ले, हिंसाचार यांना ऊत आला.
 
 
बोलसोनारो यांच्या समर्थकांनी राजधानी ब्राझीलियामध्ये प्रचंड राडा केला. नवे राष्ट्रपती म्हणून लुला यांनी शपथ घेताच बोलसोनारो यांचे समर्थक संतप्त झाले. आंदोलकांनी संसद, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयात घुसून धुडगूस घातला, प्रचंड तोडफोड आणि (Brazil Democracy) जाळपोळही या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 400 लोकांना अटक केली आहे.
 
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया
दरम्यान, (Brazil Democracy) ब्राझीलमध्ये या घटनेवर अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी तीव‘ प्रतिकि‘या व्यक्त केली आहे. बोलसोनारो यांच्या समर्थकांनी देशाची संसद, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयावर हल्लाबोल करण्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. ब्राझीलच्या लोकशाही संस्थांना अमेरिकेचे संपूर्ण पाठबळ आहे, असे बायडेन यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ब्राझीलमध्ये घडत असलेल्या दंग्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी लुला शासनाला पाठिंबा व्यक्त केला असून, लोकशाही परंपरांचे प्रत्येकाने पालन केलेच पाहिजे, या मुद्यावर भर दिला आहे.
 
 
बोलसोनारो सध्या अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात आले आहेत. त्यांनी सुरू असलेल्या उत्पाताशी आपला संबंध नाही, असे केले आहे. पण त्याचबरोबर लुला यांनी केलेल्या आरोपांचा धिक्कारही केला आहे. तसेच त्यांनी शांततापूर्ण निदर्शनांना पाठिंबाही व्यक्त केला आहे. बोलसोनारो काहीही म्हणोत, ‘पर ये ज्यो पब्लिक है, वो सब जानती है।’
 - 9422804430 
@@AUTHORINFO_V1@@