नागपूर,
Kunbi community बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघ (विदर्भ प्रदेश), नागपूरच्या वतीने 29 जानेवारीला सकाळी 10.30 वाजता जट्टेवार सभागृह, ईश्वर नगर, रमणा मारुती, नागपूर येथे भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात समाजातील मान्यवरांचा सत्कार, समाज उत्थानासाठी कार्य करणार्या मान्यवरांचा नागरिक सत्कार तसेच समाजासाठी विशेष कार्य करणार्या व्यक्तिमत्त्वांचा समाज भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येईल, असे संघटनेचे अध्यक्ष जानराव पाटील केदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या परिचय मेळाव्यात समाज बांधवांनी उपवर मुला-मुलींसह जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले.
सौजन्य ः देवराव प्रधान, संपर्क मित्र