नागपूर,
Shanti Nagar नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या आदेशानुसार 24 जानेवारीला सकाळी 10 वाजता शांतीनगर कॉलनी येथे 'हाथ से हाथ जोडो' या अभियाना अंतर्गत डॉ. सतीश पारख, ज्ञानेश्वर ठाकरे, चंदा राऊत, निर्मला बोरकर, कुंदा हरडे, अरुण मलिक, अनिल बारापात्रे, मनीष उमरेडकर, अनिल हरडे, विनायक देशमुख, अर्चना सीडाम, विजय बोरकर यांच्या नेतृत्वात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी यावेळी डॉ. सतीश पारख यांनी 'हाथ से हाथ जोडो' दिल से दिल जोडो अभियानाबाबत नागरिकांना माहिती दिली. आपला देश एकजूट राहावा, सांप्रदायिकता व संप्रभुता राहावी, Shanti Nagar आपसामध्ये सामंजस्य राहावे, यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे. यावेळी शहर काँग्रेस कमिटी, ब्लॉक व प्रभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सौजन्य निखिल कोसेकर, संपर्क मित्र