वरिष्ठ नागरिकांचा उदयनगर गार्डन हास्य व योगा क्लबतर्फे सत्कार

25 Jan 2023 14:22:08
नागपूर,
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उदयनगर गार्डन हास्य (Yoga Club) योगा क्लबतर्फे पंजाबराव उमक यांच्या अध्यक्षतेखाली हास्य क्लबच्या पंच्याहत्तरहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ सभासद व नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यानंतर सत्कारमूर्तींनी अनुभव आणि मनोगत व्यक्त केले. उदयनगर गार्डन हास्य व (Yoga Club) योगा क्लबच्या माध्यमातून स्फूर्ती मिळते, आरोग्याबाबत जागरुकताही निर्माण होते. तसेच प्रसन्न वातावरणमध्ये हसत, खेळत जगायची प्रेरणा मिळते, अशी बहुतेकांनी मनोगतातून मांडणी केली.
 
Yoga Club
 
यावेळी (Yoga Club) भीमराव बेले, डॉ. नरहरी खुणे, डॉ. वसंत डबरे, जर्नादन भाजीपाले, गजानन चावरे, शंकर कोरमकर, देवीदास अरमरकर, बाबूराव निमजे, भाऊसाहेब धानुस्कर, रामचंद्र केवटे, बबन काकडे, गणपत आकरे, माणिक झाडे, विजय चांदूरवार, तुळशीराम धोटे, गंगाधर नारनवरे व वसंत रुठे इत्यादींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मोहन निंबाळकर यांनी केले तर सचिव मधुकर भोयर यांनी आभार मानले. सर्व (Yoga Club) सदस्यांना अल्पोपहार व चहा देऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. दिलीपकुमार पंचबुद्धे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विषेश परिश्रम घेतले.
 
- सौजन्य : देवराव प्रधान, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0