विश्व मराठी संमेलना निमित्ताने...!

25 Jan 2023 05:00:11
इतस्ततः​
- शैला धाबे
vishwa marathi sahitya sammelan  महाराष्ट्र शासनाच्या, मराठी भाषा विभागातर्फे ‘मराठी तितुका मेळवावा' विश्व मराठी संमेलनात सहभागी होण्यासाठी ४ जानेवारीला मुंबई येथील वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात पोहचले. दालनाच्या आवारात चाललेलं लोककलांचं-लोकसंगीताचं प्रदर्शन डोळ्यांचे पारणे फेडत होतं. vishwa marathi sahitya sammelan  यात पहाटेची भूपाळी म्हणणारा वासुदेव होता, डोक्यांवर तुळशीवृंदावन घेऊन टाळ-मृदंगाच्या घोषात निघालेली पालखी होती, ढोल-ताशांचा दणदणीत ठेका होता, पताका घेऊन, ‘रामकृष्ण हरी' म्हणत निघालेली वारक-यांची दिंडी होती, जात्यावरच्या ओव्या होत्या, उखळावरची गाणी होती, जोगवा होता, पोवाडा होता. vishwa marathi sahitya sammelan  सुहास्य स्वागत करून, तत्परतेने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणारी चमू, आकर्षक सजावटीने नटलेलं प्रशस्त प्रवेश दालन, त्यात मराठमोळी वातावरण निर्मिती करणारे सनईचे मंजूळ स्वर, नऊवार साडी, केसांमध्ये माळलेला गजरा आणि ठसठशीत नथ अशा मराठमोळ्या पारंपरिक वेशात मिरवणा-या भगिनी,vishwa marathi sahitya sammelan  गेल्या गेल्या चहापानाचं अगत्य आणि सभागृहात प्रवेश करताच, कानी पडलेले... ‘स्वतंत्र ते भगवती...'चे उंच स्वर!
 

marathi  
 
vishwa marathi sahitya sammelan  अंगावर हर्षाचे रोमांच उभे राहिले! एकीकडे संत तुकारामांच्या ‘आम्हां घरी धन... शब्दांचीच रत्ने' तर दुसरीकडे संत ज्ञानेश्वर माउलींच्या ‘माझा म-हाठाची बोलू कौतुके -परी अमृतातेहि पैजा जिंके' ही ठळक वचन मिरवणारे भव्य फलक व्यासपीठाची शोभा वाढवत होते. सभागृहात शिवगर्जना घुमत होत्या- इतक्या गर्दीतही केशरी फेटे उठून दिसत होते. विविध देशांतून आलेल्या प्रतिनिधींशी हळूहळू ओळखी झाल्या. vishwa marathi sahitya sammelan  मग अनेक समान धागे गुंफत गप्पा सुरू झाल्या. अचानक कुणीतरी आपल्याच जिल्ह्यातील भेटली, कुणी मैत्रिणीची मैत्रीण, तर कुणी आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी होता, हे कळलं. एकत्रित जोडण्याची, गप्पा मारण्याची संधी मिळाली. त्या-त्या प्रांतात, त्या-त्या देशात मराठी भाषा टिकविण्यासाठीची ज्याची-त्याची चाललेली धडपड कळली. कुणी ‘ग्रंथ तुमच्या दारी'मधून मराठी पुस्तकांची पेटी घरोघरी पोहोचवून लहान मुलांना वाचनाची कशी गोडी लावतंय् ते कळत होतं, कुणी संस्कार वर्गांबद्दल भरभरून सांगत होत, vishwa marathi sahitya sammelan  एखादा कुणी आपल्या मंडळाच्या सांस्कृतिक मंचाबद्दल बोलत होता, तर कुणी पटकन पुढे येऊन, स्वत:च्या कवितांचं पुस्तक भेट देत- ‘वाचून अभिप्राय कळवं हं' म्हणत होतं.
 
 
मध्येच, नवी पिढी मराठी बोलताना, लिहिताना, बोलताना कशा गमती-जमती करते यावरही हास्याचे फव्वारे उडाले. vishwa marathi sahitya sammelan  मुलांसाठीच्या हसत-खेळत मराठीच्या वर्गांबद्दल बोललं गेलं. स्वाध्याय परिवाराचं, कुणी पटकन हातात-हात घेऊन म्हणालं, आम्हीही परिवार मिलन- मनुष्यगौरव दिन, गीता जयंती साजरी करतो बरं का आमच्याकडे. मग मुलं कसे एकत्र गीतापठन करतात, श्लोक पाठ करतात ते सांगून झालं. vishwa marathi sahitya sammelan  हिंदू स्वयंसेवक संघाच्या आमच्या शाखेत आम्ही सूर्यनमस्कार महायज्ञ वा महाखेलोत्सव केला हे सांगितल्यावर, मिळणारा ‘अरे वाह!' चा प्रतिसाद हुरूप वाढवत होता. कुणी बाप्पाची मोठी मूर्ती आम्ही भारतातून कशी मागवली, ते आम्ही वर्षभर ती कशी एकेकाकडे सांभाळतो सांगत असताना, vishwa marathi sahitya sammelan  ‘अहो, आमच्या राज्यात मूर्तिपूजेला विरोध- त्यामुळे गणपती बाप्पा बसवायला किती खटपट करावी लागली म्हणून सांगू?' असं म्हणत कुणी स्वत:चे अनुभव सांगत होता! आमच्या गप्पा रंगलेल्या असताना, चक्क मुक्तिसंग्रामात योगदान देणा-या एक आजी काठी टेकवत-टेकवत जवळ येऊन म्हणाल्या, ‘‘आज- आमच्या कष्टांचं सोनं झालेलं दिसतंय् बरं का बाळांनो!'' vishwa marathi sahitya sammelan
 
 
माहितीचं आदानप्रदान झालं, अनुभवांची देवाणघेवाण झाली. ‘गर्जे मराठी' संघाला भेटून अभिमानाने ऊर भरून आला, तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचा विस्तार आणि प्रगती पाहून वा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवाराचा उत्साह पाहून थक्क व्हायला झालं. मंचावर तर वेगवेगळे परिसंवाद, मुलाखती, सांस्कृतिक कार्यक्रमांची सलग तीन दिवस रेलचेल होती. आपल्या कित्येक आवडत्या कलाकारांना जवळून ऐकता आलं, पाहता आलं, अनुभवता आलं. vishwa marathi sahitya sammelan  मराठी भाषा, मराठी संस्कृती, साहित्य, उद्योग आणि मराठी खाद्य संस्कृतीचा वैभवशाली वारसा पुढे नेण्याच्या कित्येक पर्याप्त शक्यतांच्या चर्चा झाल्या. आवडत्या जुन्या लेखक, कवींना वाचता तसेच ‘नव्या लेखकांना वाचा' हे आव्हानदेखील हृदयाला भिडलं. उद्घाटनपर भाषणांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातून मायभूमीत आलेल्या पाहुण्यांचं दमदार स्वागत करीत, मराठीच्या वैभवशाली भविष्यासाठी राज्य सरकार तत्पर राहील, असा दिलासा दिला. vishwa marathi sahitya sammelan  ‘संकटांनाही संधीत परावर्तित करा,' असं सांगून मराठी मुलांना ‘उद्योजक बनण्याचा मंत्र' देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी या मंचावरून संतांची-समाजसुधारकांची-संशोधकांची आपली संपन्न महाराष्ट्रभूमी आता संपत्ती निर्माण करणा-यांचीही होवो, अशी आशा श्रोत्यांच्या मनात पेरली.
 
 
पाठोपाठ उदय सामंत यांनी- उद्योगशीलतेसाठी दिलेलं मार्गदर्शन प्रोत्साहक होतं. vishwa marathi sahitya sammelan  यात नीलमताईंनी विविध देशांच्या विद्यापीठांना जोडणाèया संधींबद्दल भाष्य केलं, तर मनीषा म्हैसकरांनी मराठी संवर्धनासाठी ‘एकीचं बळ' धारण करण्याचं आवाहन केलं. मराठीच्या जागराचा हा कार्यक्रम चालू असतानाच एका मराठी माणसाला नोबेल पारितोषिक जाहीर व्हावं, हा सर्वोच्च सुखाचा क्षणही येथेच अनुभवला. vishwa marathi sahitya sammelan  सत्कार म्हणून मंत्रिमहोदयांनी त्यांना तुळशीचं रोपटं द्यावं आणि ते नम्र स्वीकारून ते स्थानापन्न झाल्यावर - त्यांच्या कोटावर ठसठशीत मोठ्या दोन तुळशीमाळा झळकत होत्या, हे चित्र भारावून टाकणारं होतं! हे संमेलन घडून येण्यात मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांचा पुढाकार आणि ते यशस्वीरीत्या संपन्न व्हावं यासाठी त्यांच्या चमूचे सगळे प्रयत्न ठळकपणे संमेलनभर दिसत होते. vishwa marathi sahitya sammelan  भेटणा-या प्रत्येकाशी दीपक आत्मीयतेने बोलत होते, त्यांचं म्हणणं ऐकून घेत होते आणि पुढे एकत्र काम करू म्हणून आपलं भेटकार्ड देत होते.
 
 
vishwa marathi sahitya sammelan  मुलांना ‘महाराष्ट्र दर्शन' घडवून आणण्याचा उपक्रम, मुलांसाठी मराठी प्रशिक्षणाचा दर्जेदार अभ्यासक्रम तयार करून मराठी भाषा शिक्षकांना त्यासाठी प्रोत्साहन देण्याचा मराठी राज्य भाषा विभागाने संमेलनात जाहीर केलेला मानस खरोखरीच मराठी पालकांचा हुरूप वाढविणारा होता. vishwa marathi sahitya sammelan  आम्हा परदेशातून आलेल्यांचे त्या तीन दिवसांत, माहेरच्या मायेने सगळे लाड झाले. जेवणात ‘सांबारवडी, उकडीचे मोदक, श्रीखंडपुरी, पिठलं भाकरी, बासुंदी'सारख्या पदार्थांची रेलचेल ठेवून, रोज भरभरून पाहुणचारदेखील झाला. सभागृहात थाटात लावलेल्या वेगवेगळ्या प्रकाशनाच्या दालनातून फिरताना- उत्कृष्ट पुस्तके चाळता आलीत, विकत घेता आलीत. vishwa marathi sahitya sammelan  ‘मराठी ३६०' या संकल्पनेतून, अवघ्या विश्वातील मराठी माणसांना एका व्यासपीठावर आणत, मराठी भाषकांना जोडत, मायमराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहत ‘एक वैश्विक मराठी ब्रॅण्ड' बनविण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न खरोखरीच स्तुत्य होता.
 
 
२०२१ मध्ये विश्व मराठी परिषदेने घेतलेल्या ऑनलाईन विश्व संमेलनाने मराठी माणसांना एकत्र जोडण्याची भक्कम सुरुवात केली होती. vishwa marathi sahitya sammelan तिला पुढे नेत महाराष्ट्र शासनाने निव्वळ महिन्या-दोन महिन्यांच्या छोट्या कालावधीतही उत्कृष्ट नियोजन करून, वेगवेगळ्या देशांतील मराठी बांधवांना एकत्र आणत, हे भव्य संमेलन यशस्वी केलं! संमेलनाचं आमंत्रण मिळाल्यापासूनच्या आमच्या सगळ्या छोट्या-मोठ्या प्रश्नांना क्षितिज पाटुकले यांनी न थकता उत्तरे दिलीत. उत्तरा मोने यांच्या चमूने कार्यक्रमातील सहभागासाठी सहायक सूचना केल्या. vishwa marathi sahitya sammelan  त्यांचेही मनोमन आभार ! भेटत राहू, संपर्कात राहू, म्हणत नव्याने भेटलेल्या मित्रमैत्रिणींचा निरोप घेताना मन हेलावून गेलं. हे खरं असलं तरीही या संमेलनात मिळालेली ऊर्जा घेऊन, बाहेर पडलेला प्रत्येक जण आपापल्या देशी प्रयत्नांची शिकस्त करेल आणि मराठीचा झेंडा अटकेपार पोहोचवेल, यात शंका नाही. vishwa marathi sahitya sammelan  या संपन्न करणा-या अनुभूतीसाठी महाराष्ट्र शासनाचे अनेकानेक आभार!
स्टॉकहोम, स्वीडन
Powered By Sangraha 9.0