तभा वृत्तसेवा
हिंगणघाट,
येथील समर्था श्रुती राहुल सोरटे या आठ वर्षाच्या चिमुकलीची रा. स्व. संघाचे आद्य संस्थापक डॉ. हेडगेवार (Dr. Hedgewar) यांच्या जीवनकार्यावर निघत असलेल्या सिनेमासाठी बालकलाकार म्हणून निवड करण्यात आली आहे.
निर्देशक सनी मंडावरा द्वारा निर्देशित जयानंद शेट्टी द्वारा निर्मित या चित्रपटाची शूटिंग विदर्भातील विविध भागात होत असून हा चित्रपट संघ संस्थापक डॉक्टर केशव बळीरामजी हेडगेवार (Dr. Hedgewar) यांच्या जीवनावर आधारित आहे. विदर्भातील काही ठराविक बालकलाकारांमध्ये तिची निवड झाली आहे. समर्था या आधी सुद्धा विविध बाल नाटकातून आपल्या अभिनय कलेचे प्रदर्शन करत आली आहे. सध्या ती स्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगणघाट येथे दुसर्या वर्गात शिकत आहे. अभिनय सोबतच ती गायन, चित्रकला, भाषण, नृत्य, आदीमध्ये आपले कौशल्य दाखवत असते. तसेच सामाजिक कार्य, प्राणी व निसर्ग सेवा या कार्यातही ती सक्रिय आहे. भविष्यात डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जाऊन देश सेवेचा तिचा मानस आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई श्रृती दुधलकर सोरटे, वडील राहुल मोरेश्वर सोरटे, आजी शकुंतला म. दुधलकर, मामा मनोज म. दुधलकर, शिक्षक यांना दिले आहे.