संस्कृत भाषा चिरकाल टिकणारी

27 Jan 2023 17:47:40
नागपूर, 
संस्कृत भाषा (Sanskrit Language) ही अनादी असून ती चिरंतन व चिरकाल टिकणारी असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे अ.भा.अध्यक्ष खा. तेजस्वी सूर्या यांनी आज केले.
  
Sanskrit Language
 
‘संस्कृत भारती’ अ.भा. छात्र सेंलन आयोजित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन खा. तेजस्वी सूर्या यांच्या हस्ते झाले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला अयोध्याच्या श्रीरा जन्भूमी न्यासाचे कोषप्रमुख स्वामी गोविंद गिरी, ‘संस्कृत भारती’चे अ.भा. अध्यक्ष डॉ. गोपबंधू मिश्र, अ.भा. महांत्री सत्यनारायण भट्ट, विदर्भ प्रांत प्रमुख रमेश मंत्री तसेच स्वागत समितीचे अध्यक्ष प्रख्यात उद्योजक सत्यनारायण नुवाल व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 
खा. सूर्या म्हणाले की, संस्कृत भाषा (Sanskrit Language) ही भारतीय सभ्यतेचे आकर्षण आहे. समजायला सोपी असून ती समजली तर भारत, भारतीय सभ्यता समजेल. देवभाषा संस्कृत ही मानव जातीला उपलब्ध असणारी सर्वात सुंदर भाषा असून, संस्कृत ही भारतीय जीवन पद्धतीचे व्याकरण आहे. ही निसर्गाची रचना आहे. ती मृत भाषा असल्याचे काही लोक बोलतात. पण, ती अनादी असून संपूच शकत नाही. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात संस्कृत संवर्धनावर भर देण्यात आला आहे.
 
 
गोविंदगिरी हाराज म्हणाले की, भारताला एकात् ठेवण्यासाठी संस्कृत आवश्यक असून संस्कृत भाषेत (Sanskrit Language) उपलब्ध ज्ञान व विचार विश्वातल्या इतर कुठल्याच भाषेत नाही. ती भारताचा अमूल्य ठेवा आहे. ती तंत्र भाषा आहेच, मंत्र भाषाही असून मनाची संवेदना टिपणारी आहे.
 
 
गोपबंधू श्रि यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक सत्यनारायण भट्ट, स्वागतपर भाषण उद्योगपती सत्यनारायण नुवाल यांनी केले. डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी भाषांतरित केलेल्या ‘संस्कृत ज्ञानेश्वरी’ तसेच संस्कृत भाषा (Sanskrit Language) प्रचारिणी सभेच्या ‘संस्कृत भवितव्य’ साप्ताहिकाच्या संमेलन विशेषांकाचे प्रकाशन गोविंददेव गिरी यांच्या हस्ते व संपादिका डॉ. लीना रस्तोगी व विणा गानू यांच्या उपस्थितीत झाले.
संस्कृत राजभाषा व्हावी
निवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले की, संस्कृत भारतासाठी अत्यंत उपयुक्त आहे. डॉ. बाबासाहे आंबेडकर यांनी संस्कृत ही राजभाषा व्हावी, यासाठी पुढाकार घेतला होता. संस्कृत राजभाषा का होऊ शकत नाही, असा मलाही प्रश्न पडतो. संस्कृत सहजसुलभ भाषा आहेच, ती सेक्युलर म्हणजेच संगणक भाषाही आहे.
 
Powered By Sangraha 9.0