शिरपूर येथे श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव

27 Jan 2023 18:08:03
शिरपूर जैन, 
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री विश्वकर्मा Vishwakarma संस्थान मूळ देवस्थान येथे श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव साजरा होत असून, १ ते ३ फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  विश्वकर्मा संस्थान येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री चा महोत्सव साजरा होत आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, १ फेब्रुवारी रोजी सकाळी धर्म ध्वजारोहण जनार्दन पंत रत्नपारखी अध्यक्ष विश्वकर्मा संस्थान व श्रीकांत साखरकर अध्यक्ष जयंती उत्सव समिती यांचे हस्ते होणार आहे.
 

gh 
 
श्री विश्वकर्मा व संत पदमाजी Vishwakarma महाराजांचा अभिषेक व पूजा होईल. २ फेब्रुवारी रोजी सकाळी कलश यात्रा त्यानंतर गायत्री महायज्ञ, श्री विश्वकर्मा यज्ञ सुरू होईल. यावेळी यज्ञ पुरोहित म्हणून पुरुषोत्तम दुरतकर व गायत्री परिवार वाशीम हे राहतील तर ३ फेब्रुवारी रोजी सकाळी गायत्री यज्ञ हवन व पूर्णाहुती त्या नंतर श्री विश्वकर्मा प्रभूची पालखी मिरवणूक व श्री जन्मोत्सव सोहळा होईल त्यानंतर समाज मेळावा व दुपारी महाप्रसादास सुरुवात होईल. या महोत्सवादरम्यान दररोज सकाळी श्री विश्वकर्मा महापुराण वाचन गजानन मुगवानकर यांच्याकडून करण्यात येणार आहे.कोरोना काळानंतर प्रथमच श्री विश्वकर्मा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून, या सर्व कार्यक्रमांचे नियोजन अध्यक्ष व विश्वस्त समिती श्री विश्वकर्मा संस्थान शिरपूर व श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव समिती यांच्याकडून करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी व विश्वकर्मीय बांधवानी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महोत्सव समितीकडून करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0