भक्तांनो करा रिझर्वेशन... केदारनाथ धामचे पट 'या' तारखेला उघडतायत !

28 Jan 2023 11:22:20
केदारनाथ,
श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने उत्तराखंडमध्ये (Kedarnath-Badrinath Yatra) चार धाम यात्रेची तयारी सुरू झाल्याची माहिती दिली आहे. केदारनाथ धामचे दरवाजे 26 एप्रिलला आणि गंगोत्री-यमुनोत्रीचे दरवाजे 22 एप्रिलला उघडतील.
 

erererere 
 
जोशीमठबद्दल लोकांच्या मनात शंका

जोशीमठचे संकट आणि तेथील घरांना पडलेल्या भेगांबाबत  (Kedarnath-Badrinath Yatra) लोकांच्या मनात साशंकता आहे. ज्यावर सीएम पुष्कर सिंह धामी यांनी बुधवारी विधान करून ही शंका दूर केली आहे. चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू असल्याचं सीएम धामी यांनी म्हटलं आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीबरोबरच इतर सुविधांमध्येही सुधारणा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 2022 मध्ये चारधाम यात्रेबाबत एक नवा विक्रम झाला होता. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर गेल्या वर्षी चार धाम यात्रेत सुमारे 211 कोटींचा व्यवसाय झाला होता आणि पहिल्यांदाच 46 लाखांहून अधिक भाविकांनी चार धाम यात्रेला भेट दिली होती.
 
यापूर्वी 27 एप्रिल रोजी श्री बद्रीनाथ धामचे (Kedarnath-Badrinath Yatra)  दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. केदारनाथ धाम आणि गंगोत्री-यमुनोत्रीचे दरवाजे उघडण्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यासोबतच गुरुवारी बसंत पंचमीच्या मुहूर्तावर उत्तराखंडच्या नरेंद्र नगरमध्ये झालेल्या बैठकीत पंचांग गणनानंतर बद्रीनाथचे दरवाजे उघडण्याची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. बद्रीनाथ धामचे पट विधिपूर्वक उघडले जातील. बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या अवघ्या १५ दिवस आधी गडू घडा तेल कलश यात्रा काढण्यात येणार आहे, ज्याची तारीख १२ एप्रिल २०२३ निश्चित करण्यात आली आहे. 
Powered By Sangraha 9.0