चित्पावन ब्राह्मण संघाची आगळ्यावेगळ्या कार्यशाळेला भेट !

    28-Jan-2023
Total Views |
नागपूर,
चित्पावन ज्ञातीतील नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या लोकांना चित्पावन ब्राह्मण संघ  (chitpavan brahman sangh) नेहमीच प्रोत्साहित करत असतो. श्रीश देवधर यांच्या एमआयडीसी हिंगणा येथील श्री ऑटो स्टोअर्स, प्रायव्हेट लिमिटेड, वर्कशॉप या कार्यशाळेला चित्पावन ब्राह्मण संघाच्या कार्यकारिणीने नुकतीच सदिच्छा भेट दिली आणि त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली.
 
 

rtrtrt 
 
 
सगळ्या जुन्या इम्पोर्टेड कार्स पुनश्च चालू स्थितीत (chitpavan brahman sangh)रस्त्यावर उतरवून दाखविण्याचं अफलातून कार्य श्रीश देवधर करतात. त्यांच्या कार्यशाळेत सध्या जुन्या काळातील स्टुड बेकर, कॅडी लक, ब्युक, फॉक्स वॅगन, बीटल्स आदी गाड्या आहेत. कार्यशाळेत गाडी आल्यानंतर त्या गाडीच्या स्पेअर पार्टची जुळवाजुळव करण्यापासून तर त्यि पास करवून घेण्यापर्यंत सर्व कामांची त्यांनी माहिती दिली. सन १९३९ च्या आधीच्या व्हींटेज नंतरच्या क्लासिक अशा विविध गाड्यांचे त्यांनी वर्गीकरण करून सांगितले. डावीकडे स्टीअरिंग असलेल्या गाड्या प्रत्यक्ष पहावयास मिळाल्या. गाड्यांच्या किमतीबाबत सहज विचारणा केली असता पस्तीस लाखांपासून तर रुपये ऐंशी लाख व त्यापेक्षाही जास्त किंमती असल्याचे कळले.
 
जुन्या इम्पोर्टेड कार्स (chitpavan brahman sangh)पुनश्च चालू स्थितीत रस्त्यावर आणण्याचे अफलातून काम श्रीश देवधर करीत असून त्यांची चिकाटी, अभ्यास, मेहनत, नवीन क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी लागणारी जिद्द खरंच कौतुकास्पद आहे. आणि याही पुढे त्यांचे शांत, सोज्वळ व्यक्तिमत्व आणि साधी राहणी प्रभावित करणारी आहे. त्यांच्या या महान कार्यात त्यांच्या सुविद्य पत्नी स्वाती देवधर उत्तम सहकार्य करीत आहेत. देवधर यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. चित्पावन ब्राह्मण संघ कार्यकारिणी श्रीश देवधर यांचे कार्य पाहून अतिशय प्रभावीत झाली.
 
(सौजन्य :संपर्क मित्र उमाकांत रानडे )