स्वामी विवेकानंद यांचे विचार तरूण पिढीने आत्मसात करावे- डॉ. देशमुख

29 Jan 2023 17:57:43
बुलढाणा, 
स्वामी विवेकानंदांचे विचार Swami Vivekananda तरुण पिढीला आवश्यक आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्वामी विवेकानंद विचार प्रमाणपत्र अभ्यासक्रम तरुणांसाठी खुला करून देण्यात आला असून जास्तीत जास्त तरुणांनी याचा फायदा घ्यावा असे मत कार्यक्रमाचे उदघाटक कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी व्यक्त केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ द्वारा संचालित मॉडेल डिग्री कॉलेज बुलढाणा येथील स्वामी विवेकानंद विचार प्रमाणपत्र अभ्यासक्रम उदघाटन समारंभ साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
 
ghyh 
 
कार्यक्रमाचे उदघाटक Swami Vivekananda  कुलसचिव डॉ. तुषार देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकुलगुरू चौबे (संत ऑनलाईन उपस्थित होते तसेच मंचावर मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ. केदार ठोसर व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रकाश पाठक, विजय जोशी तसेच अभ्यासक्रमाचे समन्वयक प्रा. गुलाबराव सोनोने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रकुलगुरू विजयकुमार चौबे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये स्वामी विवेकानंदांचे बालपणीच ईश्वर जाणून घेण्याची तीव्र इच्छा व त्यानंतरचा प्रवास तसेच स्वामी विवेकानंद विचार स्पष्ट करत हे विचार घराघरात पोहोचवणे आवश्यक आहेत त्यासाठी अभ्यासक्रम खूप सहकार्य करेल व विद्यार्थी तसेच तरुणांनी या अभ्यासक्रमाकडे वळावे व स्वतःचा विकास करून घ्यावा असे मत व्यक्त केले कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रा.गुलाबराव सोनोने यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार देशासाठी महत्त्वाचे असून तरुणांमध्ये प्रेरणा देणारे आहेत या अभ्यासक्रमामुळे आपल्याला संस्कृति परिचय तसेच आपल्या प्रगतीसाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वाचा आहे, असे मत व्यक्त केले.
 
 
 
स्वामी विवेकानंदांच्या Swami Vivekanandaवेशभूषेमध्ये डॉ. दीपककुमार देशमुख यांनी स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील भाषण सादर केले. मनोगत पर भाषणामध्ये प्रा. प्रकाश पाठक यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांविषयी माहिती देताना दृढ निश्चय, धैर्य व कार्य करण्याची क्षमता हे तरुणांमध्ये वाढवणे महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले. तसेच मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ. केदार ठोसर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्वामी विवेकानंदांच्या विचार आचरणात आणण्याची गरज आहे त्यामुळे मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये स्वामी विवेकानंद विचार प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे तसेच सदर अभ्यासक्रमासाठी मिळत असलेला तरुणांचा प्रतिसाद पाहता कॉलेजच्या वतीने अशा प्रकारचे नवनवीन अभ्यासक्रम राबवण्याचा मानस असल्याचा विचार आपल्या मनोगतात व्यक्त केला विजय जोशी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यानंतर सर्जेराव चव्हाण यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार व कार्य यावर प्रकाश टाकला. यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी काळे आणि प्रा. समृद्धी गोडबोले मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. मुकुंद देशपांडे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, तरुण वर्ग, तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0