भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगाने निधन

    दिनांक :03-Jan-2023
Total Views |
पुणे, 
भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते.जगताप यांची गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. जगताप हे तीन टर्म आमदार राहिले आहेत. 2014 व 2019 मध्ये चिंचवड मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवड़ून आले होते.

GJKH67
 
लक्ष्मण जगताप 2014 मध्ये भाजपमध्ये येईपर्यंत जगताप हे राष्ट्रवादीचे नेते मानले जात होते. 2014 व्यतिरिक्त, त्यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. जगताप यांनी त्यांच्या 35 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कधीही निवडणूक हरली नाही. ते प्रथम 1986 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले आणि नंतर 2006 पर्यंत वारंवार विजयी झाले.