ration card जर तुम्ही सरकारी रेशन दुकानातून धान्य घेत असाल तर या बातमीवर नक्की लक्ष द्या. केंद्रातील मोदी सरकारने देशातील 80 कोटींहून अधिक गरीब जनतेला नवीन वर्षाची भेट दिली होती, त्यानुसार या वर्षीही केंद्रातील मोदी सरकार मोफत धान्य देणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मोफत रेशन एक वर्षासाठी वाढवले आहे. मात्र, मोफत धान्य मिळण्यासाठी रेशनकार्ड असणे बंधनकारक आहे. तुमच्याकडे ration card रेशन कार्ड नसेल तर ते लवकर बनवा आणि केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घ्या.