मुंबई,
गायिका अलका याज्ञिक (Alka Yagnik) यांनी सलग तिसर्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. टेलर स्विफ्ट, ड्रेक आणि बेयॉन्से यासारख्या जगातील सर्वांत मोठ्या गायकांना मागे टाकत अलका यांनी हे यश संपादन करून, यूट्यूबवर 2022 मधील सर्वाधिक ऐकलेल्या गायिका बनल्या आहेत.
गायिका अलका याज्ञिक (Alka Yagnik) यांनी त्यांच्या मधुर आवाजात अनेक अप्रतिम गाणी गायली आहेत. अलका यांच्या आवाजाचे जगभरात चाहते आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अहवालानुसार, अलका याज्ञिक यांच्या गाण्यांमध्ये 15.3 अब्ज स्ट्रीम रेकॉर्ड झाले आहेत, म्हणजे दररोज सरासरी 42 दशलक्ष स्ट्रीम. मागील दोन वर्षांतही त्या सर्वाधिक ऐकल्या गेलेल्या गायिका ठरल्या होत्या. तेव्हाही त्यांचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदविण्यात आले होते.
2021 मध्ये त्यांचे 17 अब्ज स्ट्रीम्स आणि 2020 मध्ये 16.6 अब्ज स्ट्रीम्स होते. या यादीत असेही दिसून आले की, (Alka Yagnik) अलका याज्ञिक यांचे अत्यंत प्रसिद्ध गाणे ‘एक दिन आप यूं हम को मिल जाएंगे’ हे 2021 आणि 2020 मध्ये यूट्यूबवर 16.6 वेळा स्ट्रीम केले गेले. या यादीत अलकानंतर बॅड बन्नी 14.7 अब्ज स्ट्रीम्ससह दुसर्या क‘मांकावर आहे. याच यादीत तीन भारतीय गायक आहेत. त्यापैकी उदित नारायण (10.8 अब्ज), अरिजित सिंग (10.7 अब्ज) आणि कुमार सानू (9.09 अब्ज) यांचा समावेश आहे.