संगीतकार नंदू घाणेकर अनंतात विलीन

30 Jan 2023 21:36:34
मुंबई,
मराठी मनोरंजन विश्वातील (Nandu Ghanekar) सुप्रसिद्ध संगीतकार नंदू घाणेकर यांचे मुलुंड येथील राहत्या घरी निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. नंदू घाणेकर यांच्या पार्थिवावर ठाण्यातील बाळकूम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांचे बंधू नंदू घाणेकर यांनी गेली अनेक वर्षे संगीत दिग्दर्शन केले. अभिनय आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी नावलौकिक मिळवला होता. तार्‍यांचे बेट, शाली, सुनंदा, नशीबवान अशा चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. याशिवाय काही संगीत अल्बमची निर्मितीही केली होती. एक हरहुन्नरी कलाकार आपल्यातून आज सोडून गेल्याने मराठी संगीतक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
 
Nandu Ghanekar
 
नंदू घाणेकर (Nandu Ghanekar) यांचे गिरीश घाणेकर सुप्रसिद्ब दिग्दर्शक आहेत. दोघाही घाणेकर भावंडांनी मराठी मनोरंजन विश्वात राहून कलेची सेवा केली. नंदू घाणेकर यांच्या निधनामुळे मराठी इंडस्ट्रीतील एक उत्कृष्ट संगीतकार आपण गमावला अशी हळहळ व्यक्त होते.
Powered By Sangraha 9.0