अजित डोवाल अमेरिका दौऱ्यावर...जनरल मार्क मिली यांची घेतली भेट !

    31-Jan-2023
Total Views |
वॉशिंग्टन,
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए ) अजित डोवाल  AJIT DOBHAL अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. एनएसए अजित डोवाल यांनी आज यूएस जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल मार्क मिली यांची भेट घेतली.
 

EREERER 
 
 
वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने त्यांच्या भेटीची छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली
भारतीय दूतावासाने ट्विट केले की आज एनएसए अजित डोवाल  AJIT DOBHAL यांनी जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल मार्क मिली यांची भेट घेतली. यादरम्यान भारत-अमेरिका द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंवर फलदायी चर्चा झाली.
याशिवाय एनएसए अजित डोवाल यांनी वाणिज्य सचिव जीना रायमोंडो AJIT DOBHAL आणि जेक सुलिवान यांचीही भेट घेतली. युएसआयबीसी द्वारे आयोजित गंभीर आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावरील गोलमेज परिषदेत अनेक उद्योग प्रतिनिधींनीही भाग घेतला. यावेळी त्यांच्यात इनिशिएटिव्ह फॉर क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी (आईसीईटी ) वर चर्चा झाली. एनएसए अजित डोवाल मोठ्या शिष्टमंडळासह अमेरिकेत पोहोचले आहेत. त्यात पाच सचिव दर्जाचे अधिकारी आणि भारतीय कंपन्यांचे कॉर्पोरेट नेतृत्व यांचा समावेश आहे. भारत-अमेरिका अणुकरारानंतर हा संवाद दोन्ही देशांमधील संबंधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.