बॉलिवूडचे हिंदूविरोधी षडयंत्र उद्ध्वस्त केले पाहिजे

- सेवानिवृत्त मेजर सरस त्रिपाठींचे प्रतिपादन

    31-Jan-2023
Total Views |
मुंबई, 
भारताच्या संशोधन आणि विश्लेषण शाखेच्या (Major Saras Tripathi) अर्थात् रॉच्या अधिकार्‍याने पाकिस्तानच्या आयएसआय अधिकार्‍याचे साहाय्य घेतले, असे उदाहरण आतापर्यंत ऐकले नाही. व्यावहारिकदृष्ट्याही ते पटत नाही. पठाण चित्रपटात रॉ अधिकार्‍यांविषयी घृणा निर्माण करून आयएसआय अधिकारी आणि पठाणांविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा भ्रामक प्रचार केला आहे. भारतीय सैन्याला पाकिस्तान, बांगलादेश आणि चीन सीमेवर लढावे लागत आहे तसेच देशातील अंतर्गत शत्रूंविरोधातही लढा द्यावा लागत आहे. या अंतर्गत शत्रूंपैकी बॉलिवूडमधील लोक भारताच्या विरोधात काम करीत आहेत, असा स्पष्ट आरोप दिल्ली येथील मेजर (सेवानिवृत्त) तथा लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सरस त्रिपाठी यांनी केला.
 
Major Saras Tripathi
 
बॉलिवूड पूर्वीपासूनच हिंदू पुजारी, (Major Saras Tripathi) साधू-संत तसेच हिंदू म्हणून ओळख असलेल्या पात्रांना खलनायक दाखवत आला आहे. हा षडयंत्राचा भाग असून, बॉलिवूड डी कंपनीच्या इशार्‍यावर काम करीत आहे. आपल्याला आपली संस्कृती वाचवायची असेल, तर हे हिंदूविरोधी षडयंत्र उद्ध्वस्त केले पाहिजे, असे सरस त्रिपाठी यांनी सांगितले.
 
 
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ‘बॉलिवूडचे पाकिस्तान प्रेम- पठाण’ या ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक अभय वर्तक म्हणाले की, पठाण चित्रपट दाखविणारे भारतातील विविध (Major Saras Tripathi) शहरांतील सिनेमागृहे ओस पडली आहेत, असे सोशल मीडिया तसेच अनेक माध्यमांतून स्पष्ट होत आहे. तरीसुद्धा शाहरुख खानच्या पी. आर. एजन्सीद्वारा पठाण चित्रपट सर्वत्र हाऊसफुल्ल झाला आहे, असा खोटा प्रचार केला जात आहे. पठाण चित्रपट यशस्वी झाला, असा प्रचार करून छत्रपती शिवाजी महाराज, मोदी, अमित शाह आदींना मानणारे पराभूत झाले आहेत, अशाप्रकारची वातावरणनिर्मिती केली जात आहे. काश्मीर फाईल्ससारखे काही अपवाद वगळता अनेक चित्रपटांत आतापर्यंत पाकिस्तानविषयी चांगले चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बॉलिवूडचा हा बेशरम रंग ओळखण्याची गरज आहे.