परसोडा सरपंच प्रा. स्वप्ना देशमुख राज्यस्तर पुरस्काराने सन्मानित

31 Jan 2023 20:53:44
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
भाऊसाहेब माने प्रतिष्ठानद्वारा आयोजित विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यात आर्णी तालुक्यातील सरपंच प्रा. स्वप्ना अतुल देशमुख Swapna Deshmukh यांना उत्तम कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेेखनीय कामगिरी करणार्‍यांचा त्यांच्या कार्याची पावती म्हणून आणि त्यांचा समाजाला परिचय व्हावा आणि त्यांचा आदर्श समोर ठेवून समाजकार्य करून आपला समाज, गाव विकसित करावे या उद्देशाने भाऊसाहेब माने प्रतिष्ठान 20 वर्षांपासून असे पुरस्कार देत आहे.
 
Swapna Deshmukh
 
यापूर्वी परसोडा Swapna Deshmukh ग्रामपंचायतला राज्य शासनाने विभागीय स्तरावरील वनश्री पुरस्कार, तसेच स्मार्ट ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, सरपंच ऑफ द इयर तसेच युवा सरपंच अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. या कार्यक‘मातील प्रतिष्ठानचे डॉ. विजय माने, अशोक वानखेडे, चिंतले, डॉ. गणेश जाधव यांच्यासह अनेक पक्षांचे पदाधिकारी व शेतकरी यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती.
Powered By Sangraha 9.0