असे अर्थमंत्री ज्यांनी अर्थसंकल्पच सादर केला नाही !

31 Jan 2023 15:21:35
नवी दिल्ली,
 
नवीन आर्थिक वर्षासाठीचा देशाचा अर्थसंकल्प Budget 2023-24 संसदेपुढे सादर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहीलेले आहेत. त्यासाठीची आवश्यक तयारीही पूर्ण झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण Nirmala Sitaraman पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र, देशाच्या इतिहासात असेही अर्थमंत्री होऊन गेले आहेत, ज्यांना अर्थसंकल्प Budget 2023-24 सादर करण्याची संधी आणि सन्मान मिळाला नाही.
 
 
budget
 
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या नावे सर्वाधिक प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषण करण्याचा जागतिक विक्रम आहे. Budget 2023-24 त्यांनी २ तास ४१ मिनिटांचे भाषण दिले होते. संपूर्ण देशाचे लक्ष अर्थसंकल्प आणि त्यातील तरतुदींकडे लागलेले आहे. उद्या म्हणजे १ फेब्रुवारी २०२३ रोजी त्या सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प संसदेपुढे सादर करणार आहेत. Budget 2023-24 सलग पाचव्यांदा सीतारामण अर्थसंकल्प सादर करणार असल्या तरी, देशाच्या इतिहासात एकूण ३ अर्थमंत्री असे आहेत ज्यांना अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली नाही.
 
Budget 2023-24 वर्ष १९४८ मध्ये देशाचे अर्थमंत्री असलेले क्षितीशचंद्र (के.सी.)नियोगी K.C. Niyogi हे केवळ ३५ दिवसांसाठी या पदावर होते. आर.के.शण्मुखम चेट्टी R.K.Shanmukham Chetty यांच्याकडून पदभार स्विकारल्यानंतर अवघ्या महिनाभरातच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. Budget 2023-24 या कालावधीत अर्थसंकल्प सादर करण्याची संधी नव्हती. Budget 2023-24 त्यांच्यानंतर जॉन मथाई John Mathai यांनी अर्थमंत्री म्हणून पदभार स्विकारला आणि त्यांनीच अर्थसंकल्प सादर केला.
 
अवघ्या साडेपाच महिन्याचा कार्यकाळ लाभलेले हेमवती नंदन बहुगुणा H.N.Bahuguna यांना अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली नाही. वर्ष १९७९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदीरा गांधी Indira Gandhi यांच्या मंत्रीमंडळात एच.एन.बहुगुणा अर्थमंत्री होते. Budget 2023-24 पण, त्यांच्याही कार्यकाळात अर्थसंकल्प सादर होऊ शकला नाही. स्वतंत्र भारतात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मोरारजी देसाई यांना मिळाली. त्यांनी तब्बल दहा वेळा संसदेपुढे अर्थसंकल्प सादर केला. Budget 2023-24 त्यापैकी, आठ वेळा सामान्य तर दोन वेळा अंतरीम अर्थसंकल्प मांडला.
Powered By Sangraha 9.0