बालविवाह प्रतिबंध अधिनियम कायदेविषयक प्रशिक्षण संपन्न

31 Jan 2023 19:11:51
वाशीम, 
Child Marriage Act : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कार्यालय, वाशीम अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय संस्था, तोंडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग नवी दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे बाल विवाह निर्मुलानाकरीता व जिल्हयात बाल विवाह होणार नाही, या अनुषंगाने मालेगाव येथील रामराव झनक कला व वाणिज्य महाविद्यालय येथे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम) २०१५ लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२ बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ या विषयावर मालेगाव तालुयातील ग्रामसेवक, मुख्याध्यापक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गटांच्या महिला यांचे एकदिवशीय कायदेविषयक प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले.
 
Child Marriage Act
 
यावेळी कायदा तथा परीविक्षा अधिकारी जीनसाजी चौधरी यांनी बालकांचे अधिकार लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ या विषयी माहिती दिली. संरक्षण अधिकारी भगवान ढोले यांनी बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता बालकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणांनी सज्ज राहून बाल संरक्षणासाठी सक्रीय भूमिका पार पाडावी, असे सांगितले. राजामती ढोले आणि यशदाचे प्रशिक्षक राजकुमार पडघान, प्रभू कांबळे, अश्विनी अवताडे यांनी जिल्ह्यात बालस्नेही वातावरण निर्मितीसाठी व बाल विवाह निर्मुलनाकरीता गावांमध्ये प्रभातफेरी काढून जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन केले.
 
Powered By Sangraha 9.0