शिक्षकांच्या पगारात ५ टक्के वाढ

    31-Jan-2023
Total Views |
चंदीगड, 
राज्यातील कर्मचाऱ्यांना सरकारने मोठी भेट दिली आहे. राज्यातील शाळांमध्ये नियुक्त व्यावसायिक शिक्षकांच्या मानधनात (Teachers' Salaries) वाढ करण्याचा आदेश शासनाने जारी केला आहे. पगारवाढीचा हा आदेश १ जानेवारीपासून लागू करण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयाचा लाभ लाखो शिक्षकांना मिळणार आहे.

Teachers' Salaries
 
मिळालेल्या माहितीनुसार, शासनाने व्यावसायिक शिक्षकांच्या मानधनात (Teachers' Salaries) वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे मानधनात सुमारे 1675 रुपयांची वाढ झाली आहे. शासनाच्या आदेशानंतर आता व्यावसायिक शिक्षकांना ३०५०० रुपयांऐवजी ३२०२५ रुपये मानधन देण्यात येणार आहे. त्याचवेळी, हरियाणाच्या 1186 सरकारी शाळांमध्ये 15 श्रेणींमध्ये कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण नववीपासून सुरू होते. यामध्ये कृषी, सौंदर्य, विमा, बँकिंग, वित्त, रुग्णसेवा, कापड, इंटरनेट आदी विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. यानंतर या विद्यार्थ्यांना विविध संस्थांमध्ये इंटर्नशिपही दिली जाते. यामध्ये प्राविण्य मिळवून विद्यार्थी भविष्यात स्वत:च्या पायावर उभे राहू शकतील.