जहाल माओवाद्याची छत्तीसगड पोलिसांसमोर शरणागती

    31-Jan-2023
Total Views |
दंतेवाडा, 
किमान नऊ हत्या आणि (Jahal Maoist) जाळपोळीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या जहाल माओवाद्याने छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात पोलिसांसमोर आज मंगळवारी शरणागती पत्करली, अशी माहिती अधिकार्‍याने दिली.
 
Jahal Maoist
 
राजू लेकाम असे त्याचे नाव असून, तो (Jahal Maoist) माओवाद्यांच्या जनता सरकार युनिटचा प्रमुख म्हणून शेजारच्या बिजापूर जिल्ह्यातील भैरमगड परिसरात सकि‘य होता तसेच त्याच्या शिरावर एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. माओवादाच्या पोकळ विचारसरणीला कंटाळून आणि पोलिसांनी सुरू केलेल्या पुनर्वसन योजनेने प्रभावित झाल्याने आत्मसमर्पण केले, असे त्याने सांगितले. तो दशकभरापासून माओवादी चळवळीत होता तसेच किमान नऊ जणांची हत्या, पोलिसांवरील हल्ले आणि रेल्वेरूळ उखडण्यासार‘या घटनांमध्ये सहभागी होता, असे अधिकार्‍यांनी सांगितले.