अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत घ्या

31 Jan 2023 20:42:42
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
अंगणवाडी कर्मचार्‍यांना Anganwadi workers शासकीय सेवेत नियमित करून शासकीय वेतनश्रेणी व भत्ते देण्यात यावेत, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या एसएलपी क‘. 3153/2022 या खटल्यामधील निर्णयानुसार ग‘ॅच्युईटी पूर्वलक्ष्मी प्रभावाने देणे हा निर्णय होईपर्यंत अंगणवाडी मदतनिसांना दरमहा 18000 रुपये आणि अंगणवाडी व मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा 20000 रुपये वेतन देण्यात यावे, आदी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
 
Anganwadi workers
 
मंगळवार, 31 जानेवारी रोजी निघालेल्या या Anganwadi workers मोर्चेकर्‍यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये 13 लाख अंगणवाडी केंद्रे आहेत. त्यामध्ये 13 लाख सेविका व 13 लाख मदतनीस कार्यरत आहेत.
 
 
या Anganwadi workers अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासन मानसेवी समजते. 2019 पासून अंगणवाडी सेविकांना मध्यवर्ती सरकारकडून दरमहा 5 हजार व मदतनिसांना 2500 रुपये मानधन दिले जाते. महागाई प्रचंड वाढत आहे. परंतु त्यानुसार त्यांच्या मानधानात वाढ करण्यात आलेली नाही. त्यांना कोणत्याही स्वरूपाचे सामाजिक सुरक्षिततेचे कायदे लागू करण्यात आलेले नाहीत. त्यांना किमान वेतनही लागू करण्यात आलेले नाही. त्यांची परिस्थिती वेठबिगारासारखी झाली आहे.
 
 
आमच्या Anganwadi workers शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या विविध मागण्या शासनाने तत्काळ मान्य कराव्या, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. अन्यथा हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देताना मोठ्या सं‘येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.
Powered By Sangraha 9.0