राजकुमार डुनगे यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर

31 Jan 2023 20:08:04
तभा वृत्तसेवा 
सालेकसा, 
महाराष्ट्र शासनाकडून आंतरिक सुरक्षा सेवा पदकासाठी (Service Medal) महाराष्ट्रातील एकूण 1278 पोलिस अधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे. यात सालेकसाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राजकुमार डूनगे यांचा समावेश करण्यात आला आहे. नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील सालेकसा क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला.
 
 Service Medal
 
पोलिस खात्यात आंतरिक सुरक्षा सेवा पदक (Service Medal) हा सन्मान अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. राजकुमार डुनगे यांनी आदिवासीबहुल व नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणार्‍या सालेकसा येथे 8 फेब्रुवारी 2017 ते 3 नोव्हेंबर 2020 या कालावधीत सालेकसा येथे ठाणेदार म्हणून तीन वर्षे सेवा दिली. या कालावधीत त्यांनी नक्षलग्रस्त भागात आंतरिक सुरक्षा निर्माण करण्यासाठी उत्कृष्ट कार्य केले. तसेच कोरोना काळातही सामाजिक बांधिलकी जोपासत समाज हितार्थ सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून त्यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. डुनगे आज सालेकसा येथे जरी कार्यरत नसले तरी, त्यांनी आपल्या कार्याबरोबरच जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे त्यांचे सालेकसा तालुका पत्रकार संघ, गोटूल आदिवासी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सुर्योदय क्रीडा मंडळ भजेपार, प्रेरणा मित्र परिवार व तालुकावासीयांनी अभिनंदन केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0