शहीद भगत सिंग श्री ठरला अमरावतीचा विजय भोयर

31 Jan 2023 20:33:14
तभा वृत्तसेवा 
सालोड, 
Bhagat Singh Shri : दत्ता मेघे फाउंडेशन व शहीद भगत सिंग व्यायाम प्रसारक मंडळ सालोड (हि.) द्वारा आयोजित विदर्भस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत अमरावतीचा विजय भोयर शहीद भगत सिंग श्रीचा मानकरी ठरला. या स्पर्धेचे उद्घाटन आ. पंकज भोयर यांच्याहस्ते झाले. स्वागतध्यक्ष म्हणून डॉ. अभ्यूदय मेघे तर प्रमुख अतिथी म्हणून दिलीप कृपलानी, सुनील दीक्षित, सरपंच अमोल कन्नाके, बाळासाहेब देशमुख, रेल्वे पोलिस निरीक्षक रामसिंग मीना, अंकुश ठाकूर, सचिन खोसे, अजय गौरकार, विजय येरेकर, मनोज देवघरे, अतुल जुडे, बालू ठाकरे आदींची उपस्थिती होती.
 
Bhagat Singh Shri
 
या स्पर्धेत विदर्भातून 107 स्पर्धकांनी भाग घेतला होता. पंच म्हणून अभिषेक करिंगवार नागपूर, टिकू शिंदे अमरावती, विशाल मारडवार, डॉ. योगेश देवतळे, डॉ. गावंडे, लोखंडे यांनी काम पाहिले. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन, बेस्ट पोझर, बेस्ट मसक्युलरची निवड पंचांमार्फत करण्यात आली. या स्पर्धेमध्ये वर्धा श्री म्हणून पंकज ढाकूलकर, वर्धा बेस्ट पोझर अजय मोहिते व सालोड श्री म्हणून प्रज्ज्वल मुते, बेस्ट पोझर म्हणून नाना मडावी यांना पारितोषिक देण्यात आले. विदर्भ शहीद भगत सिंग श्री विजय भोयर यांना चॅम्पियन ट्रॉफी व राहत फाउंडेशन यांच्यातर्फे 31 हजार रुपये रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
 
 
बेस्ट पोझर म्हणून अकोला येथील पोलिस उमेश भाकरे यांना ट्रॉफी व 21 हजार रुपये रोख देण्यात आले. बेस्ट मसक्युलर म्हणून कमलेश कश्यप चंद्रपूर यांना ट्रॉफी व 11 हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले. यशस्वीतेसाठी सालोडचे उपसरपंच आशिष कुचेवार, मंडळाचे अध्यक्ष संजीव वाघ, सूरज रघाटाटे, विकास खोडके, रणजित अंबाडरे, रुपेश ठाकूर, राहुल ढगे, लखन लडी, प्रज्ज्वल मुते, मनोज वाघ, मनोज सुरस्कार, एकांत वरघणे, सचिन चलमेलवार, पप्पू राऊत आदींनी सहकार्य केले. संचालन आशिष कुचेवार तर आभार अध्यक्ष संजीव वाघ यांनी मानले.
 
Powered By Sangraha 9.0