राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी पार्थ चोपडेची निवड

31 Jan 2023 21:11:27
अकोला, 
महाराष्ट्र राज्यस्तरीय शालेय मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये (Boxing Tournament) स्थानिक भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाचा पार्थ भारत चोपडे याची निवड झाली झाली असून ही स्पर्धा 8 ते 11 फेब्रुवारीदरम्यान भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. पार्थ भरत चोपडे 40 किलो वजन गटात अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करीत आहे. पार्थच्या निवडीबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष डॉ. तारा हातवळणे, सचिव गोपाल खंडेलवाल, राजकुमार चवरे, नानासाहेब कुलकर्णी, मुख्याध्यापक अभय वानखडे व उपमुख्याध्यापक रवींद्र राठोड, पर्यवेक्षक रमेश धुळे, क्रीडा शिक्षक मंगला भोपळे आदींनी त्याचे कौतुक केले आहे.
 
Boxing Tournament
Powered By Sangraha 9.0