मग्रारोहयो कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

31 Jan 2023 20:48:29
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) Magrorohyo employees कंत्राटी तत्त्वावर कार्यरत कर्मचारी मागील 10 ते 12 वर्षांपासून आहेत. शासन स्तरावर या कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. मात्र, शासनाकडून अद्याप याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. या मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास कामबंद आंदोलन पुकारू असा इशारा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
 
Magrorohyo employees
 
मनरेगा संघटनेचे अध्यक्ष संतोष पांडे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. Magrorohyo employees याप्रसंगी राजू ठाकरे, नेहा नगराळे, मनोज ठाकूर आदी कर्मचारी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे, मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कंत्राटी कर्मचार्‍यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात यावे व बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे.
 
 
योजनेतील सर्व Magrorohyo employees कंत्राटी कर्मचार्‍यांना राज्य निधी असोसिएशनमध्ये नियुक्ती देण्यात यावी. ग्रामरोजगार सेवक यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात यावे. मध्यप्रदेश शासन प्रमाणे वयाच्या 62 वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी. या मागण्या तत्काळ मान्य करण्यात याव्या, अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात कामबंद आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
Powered By Sangraha 9.0