मूर्तिजापूर येथे 12 तासांचे साखळी सूर्यनमस्कार

31 Jan 2023 20:42:29
मूर्तिजापूर, 
Surya Namaskar : येथील कृष्ण कामिनी बहुउद्देशीय संस्था, श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था, सिटी तायक्वांडो जी. के. अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने मूर्तिजापूर येथे ज्ञानेश्वर साने, दिनेश श्रीवास यांच्या मार्गदर्शनात सकाळी सहा वाजतापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सूर्यनमस्कार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. साखळी सूर्यनमस्कार कार्यक्रमात सतत 12तासांच्या कालावधीत येथील विविध शाळांनी सहभाग नोंदविला.
 
Surya Namaskar
 
यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, खेळाडूंचाही सहभाग होता. मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूल, सेंट ऑन्स हायस्कूल, लोटस स्कूल, संत गाडगेबाबा इंग्लिश कॉन्व्हेंट, लिटिल फ्लॉवर, मूर्तिजापूर हायस्कूल मूर्तिजापूर, भारतीय ज्ञानपीठ हायस्कूल, गाडगे महाराज विद्यालय, न. प. हिंदी विद्यालय, हाइट्स अकॅडमी, जी. के. अकॅडमी, संकल्प क्रीडा मंडळ, तपे हनुमान व्यायाम शाळा, सिटी तायक्वांडो क्लब, फिटनेस अकॅडमी, हॅपी वुमन क्लब इत्यादींनी सहभाग दर्शविला.
 
 
याप्रसंगी मूर्तिजापूर नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी भूगुल, रावसाहेब कांबे, कमलाकर गावंडे, माजी प्राचार्य सत्यनारायण तिवारी, मुख्याध्यापक अर्जुन मोरे, अतुल इंगळे, गजानन वर्घट, रवी गोंडकर, सुनील भोजगडिया, विठ्ठल काकोडे, संतोष माने , रावसाहेब अभ्यंकर विष्णू लोडम, विनोद देवके, अविनाश बांबल, मोहम्मद अली, संदीप जळमकर, मुन्ना श्रीवास, डॉ. सुजाता मुलमुले, आदींसह सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग दर्शविला व सूर्यनमस्कार काढले. विविध शाळांच्या मुख्याध्यापिका व शिक्षिका आणि हॅपी वुमन्स क्लबच्या सदस्यांनी सूर्यनमस्कार काढून कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमासाठी सेंट आन्स हायस्कूलचे क्रीडा शिक्षक ज्ञानेश ताले व सिटी तायक्वांडो क्लबचे दिनेश श्रीवास व त्यांच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
 
Powered By Sangraha 9.0